Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झुलेलाल जयंती शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

Webdunia
गुरूवार, 23 मार्च 2023 (09:44 IST)
दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी चेटीचंद आणि झुलेलाल जयंती साजरी केली जाते. सिंधी समाजासाठी या दिवसाला विशेष महत्त्व आहे, कारण या दिवसापासून सिंधी हिंदूंचे नवीन वर्ष सुरू होते. चेटीचंदच्या दिवशी सिंधी समाजातील लोक भगवान झुलेलालची भक्तिभावाने पूजा करतात. मान्यतेनुसार, संत झुलेलाल हे वरुण देवाचे अवतार मानले जातात. या वर्षी चेटीचंद किंवा झुलेलाल जयंती केव्हा आहे हे जाणून घेऊया?
 
 चेटीचंद 2023 ची तारीख:-
पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी 21 मार्च 2023 रोजी रात्री 10.52 वाजता सुरू होईल आणि 22 मार्च 2023 रोजी रात्री 8.20 वाजता समाप्त होईल. 22 मार्च 2023 रोजी चेटीचंद सण साजरा केला जाणार आहे.
चेटीचंद मुहूर्त - संध्याकाळी 06:32 - रात्री 07:14 (कालावधी 42 मिनिटे)
 
चेटीचंद सणाचे महत्त्व :-
चैत्र महिन्याला सिंधीमध्ये चेत म्हणतात आणि चंद्राला चंद म्हणतात, म्हणून चेटीचंद म्हणजे चैत्राचा चंद्र. चेटीचंद हा युगपुरुषाचा अवतार भगवान झुलेलाल यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो. भगवान झुलेलालजींना पाणी आणि प्रकाशाचा अवतार मानले गेले आहे. असे म्हणतात की प्राचीन काळी सिंधी समाजातील लोक जलमार्गाने प्रवास करत असत. अशा परिस्थितीत ते जलदेव झुलेलेलालला आपला प्रवास सुखरूप होण्यासाठी प्रार्थना करायचे आणि प्रवास यशस्वी झाल्यावर भगवान झुलेलालचे आभार व्यक्त करायचे. या परंपरेला अनुसरून चेटीचंदचा सण मानला जातो. असे मानले जाते की भगवान झुलेलालची पूजा केल्याने मनुष्याचे सर्व अडथळे दूर होतात आणि व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगतीचा मार्ग सुकर होतो.

संबंधित माहिती

11 Maruti Temples समर्थांनी स्थापन केलेले 11 मारुती

Hanuman Jayanti शुभ योग घडत असल्यामुळे या 3 राशींना मिळणार आर्थिक लाभ !

श्री हनूमत् पञ्च चामरम्

हनुमान जयंती प्रसाद इमरती रेसिपी Imarti Recipe

मंगळवारी हनुमान मंत्राचा जाप केल्याने सर्व कष्ट होतील दूर

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

पुढील लेख
Show comments