History of Holi : हिंदू पंचगानुसार प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. तर दुसऱ्या दिवशी धूलिवंदन साजरे केले जाते. असे मानले जाते की हे पर्व खूप प्राचीन काळापासून साजरे केले जाते. भारतात प्रत्येक राज्यात या उत्सवाची परंपरा, नाव आणि रंग बदलत आलेले आहे. चला जाणून घेऊ या होळीच्या सणाचा इतिहास.
होळीचे ऐतिहासिक तथ्य-
1. आर्यांची होलका- प्राचीन काळात होळीला होलका नवाने ओळखले जायचे आणि या दिवशी आर्य नवात्रैष्टि यज्ञ करायचे. या पर्वावर हवन केल्यानंतर होलका नावाच्या अन्नाचा प्रसाद घेण्याची परंपरा होती. होलका म्हणजे शेतात पडलेले अन्न जे अर्धे कच्चे आणि अर्धे पिकलेले असते. कदाचित म्हणूनच याचे नाव होळिका उत्सव ठेवण्यात आले असेल. प्राचीन काळापासून नव्या पिकाचा काही भाग आधी देवीदेवतांना अर्पित केला जातो. यामुळे हे समजतेकी हा सण वैदिक काळापासून साजरा केला जात आहे. सिंधु घाटीच्या सभ्यता अवषेशांमध्ये होळी आणि दिवाळी साजरी केली जायची याचे पुरावे मिळतात.
2. मंदिरांवर चित्रित होळीचे पर्व-
भारतातील प्राचीन मंदिरांच्या भिंतींवर होळी उत्सव संबंधित वेगवेगळ्या मूर्ती किंवा चित्र काढलेले मिळतात. असेच 16 व्या शतकातील एक मंदिर विजयनगरची राजधानी हंपी मध्ये आहे. अहमदनगर चित्रे आणि मेवाड चित्रे यांमध्ये देखील होळी उत्सवचे चित्र मिळतात. ज्ञात रुपाने हा सण 600 ई.स. पूर्व पासून साजरा केला जात आहे. होळीचे वर्णन जैमिनिचे पूर्वमिमांसा सूत्र आणि कथक ग्रहय सूत्र मध्ये देखील आहे. पहिले होळीचे रंग टेसू किंवा पलाशच्या फूलांपासून बनायचे आणि त्यांना गुलाल बोलले जायचे. पण वेळेसोबत रंगांमध्ये नविन नविन प्रयोग केले जाऊ लागले.
पौराणिक तथ्य होळीच्या इतिहासाचे-
1. होळिका दहन- सतयुगात या दिवशी राक्षस हिरण्यकश्यपची बहिण होळिकाचे दहन झाले होते आणि भक्त प्रल्हाद वाचले होते. या पौराणिक कथेच्या आठवणीकरता होळी दहन केले जाते. हा होळीचा पहिला दिवस असतो. म्हणून या कारणानेच 'होलिकात्वस' बोलले जाते.
2. कामदेवला भस्म केले होते- सतयुग याच दिवशी भगवान शंकरांनी कामदेवला भस्म केल्यानंतर परत जिवंत केले होते. तसेच असे पण सांगितले जाते की, या दिवशी राजा पृथुने राज्यातील मुलांना वाचवण्यासाठी राक्षसी ढुंढीला लाकडे जाळुन आग लावून मारले होते. याकरिता होळीला 'वसंत महोत्सव' किंवा 'काम महोत्सव' देखील म्हणतात.
3. फाग उत्सव- त्रेता युगाच्या प्ररंभला श्री हरि विष्णुंनी धूलिवंदन केले होते. म्हणून याकरिता होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन साजरे केले जाते.
4. होळी दहन नंतर 'रंग उत्सव' साजरी करण्याची परंपरा श्रीकृष्णांच्या व्दापर युगापासून प्रारंभ झाली आहे. त्या वेळेपासूनच याचे नाव फगवाह झाले. कारण होळी फाल्गुन महिन्यात येते. तसेच श्रीकृष्णांनी होळीच्या सणाला रंग जोडले होते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.