Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेता टायलर क्रिस्टोफर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Webdunia
बुधवार, 1 नोव्हेंबर 2023 (15:43 IST)
social media
Tyler christopher passed away : हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. सुप्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेते टायलर क्रिस्टोफर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. टायलर क्रिस्टोफर यांनी वयाच्या 50 व्या वर्षी त्यांच्या सॅन दिएगो अपार्टमेंटमध्ये अखेरचा श्वास घेतला. 'जनरल हॉस्पिटल' आणि 'डेज ऑफ अवर लाइव्ह' या शोसाठी हा अभिनेता प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध होता. अभिनेत्याच्या मृत्यूची त्याच्या 'जनरल हॉस्पिटल' सह-कलाकार मॉरिस बेनार्ड यांनी पुष्टी केली. 
 
टायलर क्रिस्टोफरच्या मृत्यूबद्दल दुःखद माहिती देताना, त्याचा सह-कलाकार मॉरिस बेनार्डने Instagram वर एक संदेश शेअर केला. अभिनेत्याने लिहिले की, 'आम्ही टायलर क्रिस्टोफर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खाने शेअर करत आहोत. टायलरचे आज सकाळी त्याच्या सॅन दिएगो अपार्टमेंटमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आमच्या प्रिय मित्राच्या निधनामुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे आणि आम्ही त्याच्या मुलांसाठी आणि त्यांच्या वडिलांसाठी प्रार्थना करतो.
 
टायलर क्रिस्टोफर यांच्या निधनाने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे . अभिनेत्याचे मित्र आणि सहकलाकार सर्वजण त्याच्या आत्म्याला शांती लाभो यासाठी प्रार्थना करत आहेत. टायलर क्रिस्टोफरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलताना, अभिनेत्याने 1996 ते 2016 पर्यंत निकोलस कॅसाडाइनची भूमिका केली आणि त्यानंतर 'जनरल हॉस्पिटल' या वैद्यकीय सोप ऑपेरामध्ये कॉनर बिशप (2004 ते 2005) म्हणून दिसले. 'डेज ऑफ अवर लाइफ' मधील स्टीफन डिमेरा या भूमिकेसाठीही ते  लोकप्रिय आहे.
 











Edited by - Priya Dixit   
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सलमान खानची सिकंदर'च्या सेटवर 'किक 2' ची घोषणा

आलिया भट्ट आणि शर्वरी चा अल्फा, YRF चा पहिला महिला-प्रधान स्पाय चित्रपट , २५ डिसेंबर २०२५ ला प्रदर्शित होणार!

Impostor Syndrome आजाराने त्रस्त आहे अनन्या पांडे, या सिंड्रोम बद्दल जाणून घ्या

आयुष्मान खुरानाने भारताच्या पॅरा ऑलिम्पिक स्टार्सना हृदयस्पर्शी कविता समर्पित केली

करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता, जिंकले हे बक्षीस

सर्व पहा

नवीन

बंड्याने गुरुजींसाठी चष्मा बनवला

तुम्ही दागिने घेत का नाही?

33 वर्षांनंतर पडद्यावर रजनीकांत आणि अमिताभ बच्चन जोडीचा धमाकेदार ट्रेलर वेट्टयान रिलीज

सलमान खानची सिकंदर'च्या सेटवर 'किक 2' ची घोषणा

चंद्रघंटा देवी मंदिर प्रयागराज

पुढील लेख
Show comments