Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अॅव्हेंजर्स एंडगेम अभिनेता जेरेमी रेनर यांचा अपघात

Webdunia
सोमवार, 2 जानेवारी 2023 (20:25 IST)
मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा सुपरहिरो हॉकीची भूमिका साकारणारा अभिनेता जेरेमी रेनरबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता अपघाताचा बळी ठरला, त्यानंतर त्याला तातडीने एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिपोर्टनुसार जेरेमीची प्रकृती 'गंभीर पण स्थिर' असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रचंड बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे त्यांच्यासोबत हा अपघात झाला.
 
ऑस्कर-नामांकित अभिनेता जेरेमी रेनरला रविवारी एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले की अभिनेत्यावर सर्वोत्तम उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पण ते स्थिर आहेत. त्यांचे कुटुंब आता त्यांच्यासोबत आहे आणि त्यांची चांगली काळजी घेतली जात आहे.
 
नवीन वर्षाच्या दिवशी बर्फाचे वादळ होते ज्यानंतर अभिनेता पडलेला बर्फ साफ करत होते. यादरम्यान त्याच्यासोबत अपघात झाला आणि तो जखमी झाला. यानंतर त्यांना तात्काळ विमानाने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुसळधार बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर बर्फ साचल्याने वाहनांची ये-जा करणे कठीण झाले होते.
 
रेनर हे हॉलिवूडमधील लोकप्रिय नाव आहे. दोन दशकांच्या कारकीर्दीत, अभिनेत्याला 2010 मध्ये द हर्ट लॉकरसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे ऑस्कर नामांकन आणि पुढच्या वर्षी द टाऊनसाठी सहाय्यक अभिनेता ऑस्कर नामांकन मिळाले. 
 
Edited By - Priya DIxit 
 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

शॉर्ट्स घालून मंदिरात पोहचली अंकिता लोखंडे, लोक संतापले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

Panchayat 3 Trailer relese : पंचायत 3 चा धमाकेदार ट्रेलर आला

पुढील लेख
Show comments