'ट्रिपल एक्स रिटर्न्स'मध्ये झळकणार बॉलिवूडची मस्तानी

गुरूवार, 6 सप्टेंबर 2018 (12:18 IST)
बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरडुपरहिट चित्रपट देणारी दीपिका पदुकोणने तिची हॉलिवूडमध्येही ओळख निर्माण केली असून दिग्दर्शक विन डेजलच्या 'एक्सएक्सएक्स- रिटर्न ऑफ जेंडर केज' या हॉलिवूडपटातून पदार्पण केले होते. पण दीपिकाचीच वर्णी याच चित्रपटाच्या पुढच्या भागातही लागली आहे. दिग्दर्शक डिजे कारूसो यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. प्रेक्षकांनी दीपिकाच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही, पण तिने तिच्या अभिनयाची चुणूक मात्र दिग्दर्शकांना दाखवली असल्यामुळे या चित्रपटाच्या दुसर्‍या भागातही दिग्दर्शकांनी दीपिकाला एन्ट्री देण्याचे ठरवले आहे. दीपिका व रणवीरच्या लग्नाच्याही चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये सुरू आहेत. लवकरच दोघेही लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. 'दीपवीर'च्या लग्नासोबतच दीपिकाचा दूसरा हॉलिवूडपटही चाहत्यांना पाहायला ळिणार आहे, त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येते.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख शाहीद - मीराला मुलगा झाला