प्रसिद्ध कोरियन म्युझिक बँड BTS चं ‘डायनामाइट’ असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. केवळ युरोप अमेरिकाच नाही तर भारतातही हे गाणं चर्चेत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे केवळ २४ तासांत या गाण्याने युट्यूबवर सर्वाधिक व्हूजचा एक विक्रम प्रस्थापित केला आहे. ‘डायनामाइट’ला अवघ्या २४ तासांत तब्बल १० कोटी व्हूज मिळाले आहेत.
BTS हे प्रसिद्ध कोरियन म्युझिक बँड आहे. वी, आरएम, सुगा, जिन, जंगकुक, जे हॉप आणि जिमिन या सात कलाकारांनी मिळून हा ग्रुप सुरु केला. या ग्रुपने वर्ल्ड स्टेज शोमध्ये देखील कमाल केली होती. ‘डायनामाइट’ हे त्यांचं पहिलं इंग्लिश गाणं आहे. पहिल्या २० मिनिटांत तब्बल एक कोटी लोकांनी हा व्हिडीओ पाहिला होता. त्यानंतर ‘डायनामाइट’ला अवघ्या २४ तासांत तब्बल १० कोटी व्हूज मिळाले आहेत.
यापूर्वी सर्वाधिक व्हूजचा विक्रम ब्लॅकपिंक या ग्रुपच्या नावावर होता. त्यांच्या ‘हाउ यू लाइक दॅट’ या गाण्याला २४ तासांत सात कोटी लोकांनी पाहिलं होतं.