Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इराकमधील भीषण अपघात: कोविड -19 रुग्णालयात भीषण आगीत 50 जण होरपळून ठार झाले

Webdunia
मंगळवार, 13 जुलै 2021 (09:51 IST)
इराकच्या एका कोविड -19 रुग्णालयात एक वेदनादायक अपघात झाला आहे. या रुग्णालयात भीषण आग लागून 50 लोक ठार आणि अनेक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. 
 
नासिरिया शहरातील या रुग्णालयात कमीतकमी 50 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून इतरांची प्रकृती चिंताजनक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मरण पावलेली माणसे अतिशय वाईट अवस्थेत होरपळली आहेत .ते म्हणाले की ही आग इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागली. ऑक्सिजन सिलिंडर फुटल्यामुळे ही आग लागल्याचे आणखी एका अधिकऱ्याने सांगितले.
 
आरोग्य मंत्रालयाने आगीच्या कारणाबद्दल काहीही सांगितले नाही. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, रुग्णालयात हा वार्ड तीन महिन्यांपूर्वी उघडण्यात आला होता आणि त्यामध्ये 70 बेड होते.
 
आरोग्य विभागाचे प्रवक्तेने सांगितले की, आगलागली त्यावेळी किमान 63 रुग्ण वॉर्डच्या आत होते. इराकमधील रुग्णालयात यंदा आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये बगदादमधील रुग्णालयात ऑक्सिजन टँक फुटल्याने कमीतकमी 82 लोक ठार झाले होते.
 
घटनास्थळी पासून माहिती मिळाली आहे की आरोग्य कर्मचा्यांनी जळत्या हॉस्पिटलमधून मृतदेह बाहेर काढले.आग नियंत्रणात आणल्यानंतर कोरोना व्हायरस हॉस्पिटलमध्ये मदत व बचाव कार्य सुरू असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. पण दाट धुरामुळे काही वॉर्डात जाणे कठीण झाले. 
 
प्राथमिक पोलिस अहवालात असे सांगितले गेले आहे की, रुग्णालयाच्या कोविड 19 प्रभागात ऑक्सिजन टँक फुटल्याने ही आग लागली. हॉस्पिटलच्या गार्डने सांगितले की कोविड वॉर्डच्या आत मला मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला आणि त्यानंतर आग खूप वेगाने पसरली.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments