Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कर्करोगामुळे दृष्टी जात आहे, पुतिन दीर्घायुष्य जगू शकणार नाहीत: गुप्तहेरांचा दावा

Webdunia
सोमवार, 30 मे 2022 (23:28 IST)
डॉक्टरांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना तीन वर्षांची मुदत दिल्याचा दावा रशियाच्या एका गुप्तचर अधिकाऱ्याने केला आहे. कॅन्सर हळूहळू वाढत असून त्यामुळे त्यांची दृष्टीही जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये अशा बातम्या येत आहेत की, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. मात्र, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी पुतीन आजारी असल्याचे ठामपणे नाकारले.
 
 सर्गेई म्हणाले की अध्यक्ष पुतिन यांना या आजाराची कोणतीही लक्षणे नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एफएसबीच्या अधिकाऱ्याने यूकेमध्ये राहणारा माजी रशियन गुप्तहेर कार्पिकोव्हला संदेश पाठवून ही माहिती दिली होती. 
 
या मेसेजमध्ये असे लिहिले होते की, आम्हाला सांगण्यात आले आहे की, त्यांना डोकेदुखीचा त्रास होत आहे. याशिवाय जेव्हा तो टीव्हीवर येतात तेव्हा त्यांना मोठ्या अक्षरात लिहिलेला कागद दिला जातो. अक्षरे इतकी मोठी आहेत की पानात फक्त काही वाक्ये येतात. त्यांची दृष्टी खूप वेगाने कमी होत आहे. याशिवाय त्यांचे हातपाय देखील कमजोर  असल्याचेही एका अहवालात म्हटले आहे.
 
या महिन्यात पुतिन यांच्या पोटातील द्रव काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागल्याच्या बातम्याही आल्या होत्या. कोणतीही अडचण न येता त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, रशियन सरकारने त्यांच्या प्रकृतीबाबत केलेले हे दावे फेटाळले आहेत. परराष्ट्र मंत्री म्हणाले, मला वाटत नाही की अशा प्रकारे एखाद्याचा आजार ओळखता येईल. पुतिन हे दोन दशकांपासून रशियात सत्तेवर आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

पुन्हा झडती: उद्धव ठाकरेंच्या बॅगेत भगवा पिशवी, नाना पटोले यांच्या हेलिकॉप्टर मध्ये काय आढळलं ? Video

महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडी येण्याची शक्यता - केसी वेणुगोपाल

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi: राहुल गांधींचा 5 लाखांच्या नोकऱ्या हिसकावून घेतल्याचा आरोप

नंदुरबारमध्ये राहुल गांधी म्हणाले, भाजप आणि आरएसएसने आदिवासींना वनवासी संबोधून त्यांचा अपमान केला

'तुमचा डिस्क्लेमर ट्रम्पच्या बातमीच्या खाली...', SC न्यायाधीशांनी NCP चिन्हाच्या वादावर केली टीका

पुढील लेख
Show comments