Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना : अमेरिकेवर सर्वात मोठा सायबर हल्ला, आणीबाणी लागू

Webdunia
सोमवार, 10 मे 2021 (15:26 IST)
अमेरिकेतील सर्वात मोठ्या सरकारी इंधन पाईपलाईनवर झालेल्या सायबर हल्ल्यानंतर देशात आणीबाणीची घोषणा करण्यात आलीय.
 
जाणकारांच्या मते, या इंधन कंपनीचे बरेचसे कर्मचारी कोरोनामुळे घरातून कॉम्प्युटर वापरत होते. त्याचा फायदा हॅकर्सनी घेतला असण्याची शक्यता आहे.
 
कोलोनियल पाईपलाईनमधून दररोज 25 लाख बॅरल तेल जातं. अमेरिकेच्या ईस्ट कोस्टच्या राज्यांमध्ये डिझेल, गॅस आणि जेट इंधनांची 45 टक्के गरज या पाईपलाईनच्या माध्यमातून पूर्ण होते.
 
पाईपलाईनवर सायबर गुन्हेगारांच्या एका गटानं शुक्रवारी (8 मे) हल्ला केला. त्यानंतर दुरुस्तीचं काम करण्यात येत आहे.
अमेरिकन सरकारनं आणीबाणी लागू केल्यानंतर आता इंधनाचा पुरवठा पाईपलाईनऐवजी रस्त्यांमार्गे होण्याची शक्यता आहे.
 
जाणकारांच्या मते, याच घटनेमुळे सोमवारी (10 मे) इंधनाचे दर 2-3 टक्क्यांनी वाढतील. तसंच, जर हे प्रकरण लवकरात लवकर निस्तरलं गेलं नाही, तर याचा परिणाम आणखी व्यापक होण्याची शक्यता आहे.
 
काही सूत्रांनी या अंदाजाला दुजोरा दिलाय की, हा रॅन्समवेअर हल्ला डार्कसाईड नावाच्या एका सायबर गुन्हेगारी गटानं केलाय. त्यांनी गुरुवारी (7 मे) कोलोनियल नेटवर्कमध्ये घुसखोरी केली आणि जवळपास 100 जीबी डेटा ताब्यात घेतला.
 
यानंतर हॅकर्सनी काही कॉम्प्युटर आणि सर्व्हरवरही डेटा लॉक केला. त्यानंतर शुक्रवारी (8 मे) खंडणीची मागणी केली. खंडणी मागताना धमकी दिली गेली की, पैसे न दिल्यास हा डेटा इंटरनेटवर लीक करण्यात येईल.
अमेरिकेतील या सरकारी इंधन कंपनीनं रविवारी (9 मे) रात्री सांगिलं की, इंधन पुरवठा सेवा पूर्ववत करण्यासाठी पोलीस, सायबर सुरक्षातज्ज्ञ आणि ऊर्जा विभागाशी संपर्कात आहोत.
 
या कंपनीच्या चार मुख्य पाईपलाईन ठप्प असून, टर्मिनवरून डिलिव्हरी पॉईंटपर्यंत इंधन घेऊन जाणाऱ्या छोट्या छोट्या पाईपलाईन व्यवस्थित काम करत आहेत.
 
कंपनीचं म्हणणं आहे की, "सायबर हल्ल्याची माहिती मिळताच, सिस्टमपासून काही लाईन वेगळ्या केल्या. जेणेकरून त्यांच्यावरही हल्ला होऊ नये. यामुळे आमच्या सर्व पाईपलाईन आणि काही आयटी सिस्टमचं काम काही वेळासाठी थांबलं. आता ते नीट करण्याचं काम सुरू आहे."
 
तेल बाजाराचे विश्लेषक गौरव शर्मा यांनी बीबीसीला सांगितलं की, आताच्या घडीला बरंचसं इंधन टेक्सास राज्यातील रिफायनरीत अडकून पडलंय.
 
ते पुढे म्हणतात, "आणीबाणी लागू करून तेल, गॅस यांसारख्या इंधनांच्या टॅंकर्सना न्यूयॉर्कपर्यंत पाठवलं जाऊ शकतं. मात्र, पाईपलाईनच्या तुलनेत हा पुरवठा अत्यंत कमीच असेल. 11 मे पर्यंत जर हे दुरुस्त केलं गेलं नाही, तर मोठ्या अडचणीत अडकतील."
"सर्वात आधी अटलांटा आणि टेनेसीवर परिणाम होईल. त्यानंतर हा परिणाम वाढत जात न्यूयॉर्कपर्यंत पोहोचेल," असं गौरव शर्मा म्हणतात.
 
"अमेरिकेत इंधनाची वाढ वाढतेय. कारण अमेरिकेत कोरोनाच्या साथीतून पुन्हा उभं राहण्यासाठी लोक बाहेर पडू लागलेत आणि तेल कंपन्या वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी संघर्ष करताना दिसतेय," असं शर्मा सांगता.
 
हल्ला कसा झाला?
लंडनस्थित सायबर सिक्युरिटी कंपनी डिजिटल शॅडोजच्या मते, कोलोनियन पाईपलाईनवर हल्ल्याचं सर्वात मोठं कारण कोरोनाची साथ असू शकते. कारण कंपनीचे बरेचसे इंजिनियर घरातून कॉम्प्युटरवर काम करत होते.
 
डिजिटल शॅडोजचे सहसंस्थापक आणि चीफ इनोव्हेशन ऑफिसर जेम्स चॅपल यांच्या मते, डार्कसाईडने टीम व्ह्यूवर आणि मायक्रोसॉफ्ट रिमोट डेस्कटॉप यांसारख्या रिमोट सॉफ्टवेअरशी संबंधित अकाऊंटचे लॉगइन डिटेल खरेदी केले. कुणीही व्यक्ती शोडानसारख्या सर्च इंजिनवर इंटरनेटशी संबंधित कॉम्प्युटरचे लॉगइन पोर्टल्सची माहिती मिळवू शकते. त्यानंतर हॅकर्स युजरनेम आणि पासवर्डच्या माध्यमातून अकाऊंटमध्ये लॉगइन करण्याचा प्रयत्न करतात.
 
चॅपल म्हणतात की, अनेक लोक आता याचा शिकार होतायेत. ही एक मोठी समस्या बनतेय. दररोज नवीन शिकार बनवतोय. लहान व्यवसाय याचं शिकार बनत असल्यानं जागतिक अर्थव्यवस्थेसाठी मोठी डोकेदुखी बनत चाललीय.
 
"सायबर गुन्हेगारांचा हा गट कुठल्यातरी रशियन भाषिक देशात आहे. कारण हा गट रशिया आणि आजूबाजूच्या देशांमधील कंपन्यांवर हल्ले करत नाही," असं चॅपल यांच्या कंपनीचं संशोधन सांगतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेस वर टोला

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

LIVE: अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

पुढील लेख
Show comments