Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के, जीवित हानी नाही

Webdunia
मंगळवार, 21 नोव्हेंबर 2023 (07:32 IST)
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरनुसार, सोमवारी रात्री उशिरा झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 एवढी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू काबूलमध्ये ७३ किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. काही महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये सुमारे 6 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते.
 
अफगाणिस्तानातील काबूलमध्ये सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले.काही महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये सुमारे 6 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे शेकडो माती-विटांची घरे कोसळली, ज्यामुळे चार हजारांहून अधिक लोक मरण पावले

भूकंप का होतात?
पृथ्वीचं कवच एकसंध नाही तर अनेक टेक्टॉनिक प्लेट्स म्हणजे भूपट्टांनी मिळून बनलं आहे. या भूपट्टांच्या सीमा जिथे एकमेकांना भिडतात, तिथे भूगर्भीय हालचालींची तीव्रता जास्त असते.
 
या प्लेट्स एकमेकांशी घासतात, एकमेकांपासून दूर जातात किंवा कधी एक प्लेट दुसऱ्या प्लेटवर चढते.
 
वर्षाला जास्तीत जास्त 1 ते 10 सेंटीमीटर एवढ्या मंद गतीनं ही हालचाल होत असते. पण कधीकधी त्यातही अडथळा येऊन दबाव निर्माण होतो. मग अचानक तो दबाव मोकळा होतो, तेव्हा त्यातून मोठा भूकंप येऊ शकतो.
 
पृथ्वीवर असे तीन मुख्य प्रदेश आहेत जिथे मोठ्या भूपट्टांच्या हालचाली मोठ्या प्रमाणात होत आहेत. पॅसिफिक रिंग ऑफ फायर, मिड अटलांटिक रिज आणि अल्पाईड बेल्ट म्हणजे आल्प्सपासून हिमालयापर्यंतचा पट्टा.
 
अल्पाईड बेल्टच्या पूर्व भागात भारतीय भूपट्ट ही युरेशियन प्लेटखाली जाते आहे, त्यातून हिमालय पर्वत आणि उत्तर भारताचा भाग, अंदमान आणि कच्छचं रण तसंच तिबेट, पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये भूकंप होतात.
 



Edited by - Priya Dixit   
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

‘हवस के पुजारी का, मौलवी का नाही?’, मौलाना यांनी बागेश्वर बाबांचे विधान घृणास्पद म्हटले

एअर इंडिया एक्सप्रेस आणि एआयएक्स कनेक्टचे विलीनीकरण पूर्ण,डीजीसीए ने दिली मान्यता

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस केली

IND vs BAN: भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला मालिका जिंकली

थायलंडमध्ये स्कूल बसला आग, विद्यार्थ्यांसह 25 जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments