Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इम्रान खानच्या माजी पत्नीच्या गाडीवर गोळीबार, विचारले- हा आहे नवा पाकिस्तान?

Webdunia
सोमवार, 3 जानेवारी 2022 (11:38 IST)
इम्रान खानची माजी पत्नी रेहम खानवर हल्ला करण्यात आला असून त्यांच्या कारवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार घडला जेव्हा त्या लग्न आटोपून घरी परतत होत्या, त्यावेळी त्यांच्या गाडीवर अचानक गोळीबार झाला. त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत इम्रान खान सरकारवर निशाणा साधला आहे, एवढेच नाही तर हाच नवा पाकिस्तान आहे का असा सवालही त्यांनी केला आहे.
 
खरं तर, सोमवारी त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, 'माझ्या पुतण्याच्या लग्नानंतर रात्री घरी परतत होतो, त्यादरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कारवर गोळीबार केला. त्यांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला, त्या वेळी सुरक्षा कर्मचारी आणि चालकही कारमध्ये उपस्थित होते. मी माझी गाडी बदलली. हा इम्रान खानचा नया पाकिस्तान आहे का? लुटारू, भ्याड आणि लोभी लोकांच्या देशात आपले स्वागत आहे.
 
 
महत्वाचे म्हणजे की ब्रिटिश पाकिस्तानी वंशाची पत्रकार रेहम खान पाकिस्तानच्या पंतप्रधानांची दुसरी पत्नी होती. लग्नानंतर वर्षभरातच दोघांचा घटस्फोट झाला. रेहम खानने इम्रान खानवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिने अनेक मुद्द्यांवर माजी पतीला घेरले आहे. पाकिस्तानातील वाढत्या बलात्काराच्या घटनांमध्ये महिलांच्या कपड्यांबाबत इम्रान खानच्या वादग्रस्त विधानाला रेहम खानने यापूर्वीच खडे बोल सुनावले होते.

संबंधित माहिती

पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू

मनिका बत्रा आणि शरथ कमल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघाचे नेतृत्व करतील

Russia-Ukrain War: रशिया युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षां विरोधात अपप्रचार करत असण्याचा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा दावा

भाजपने रचला संपूर्ण कट, घटनेच्या वेळी केजरीवाल घरी नव्हते स्वातीचे आरोप खोटे असल्याचा अतीशी म्हणाल्या

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

पुढील लेख
Show comments