पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ परिसरात शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री पाकिस्ताननं तोफगोळ्यांचा मारा तसंच गोळीबार केला. दरम्यान आताही गोळीबार सुरू आहे. भारतीय जवानांकडूनही पाकिस्तानच्या गोळीबाराला जशास तसं चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. दरम्यान, या गोळीबारात एक नागरिक जखमी आहे.
याआधी भारतीय लष्कराने पाकिस्तानी चौक्यांवर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात गुरुवारी पाकिस्तानचे पाच सैनिक ठार, तर सहा जखमी झाले होते. तत्पूर्वी पहाटे पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात गोळीबार केला होता. भारतीय सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांनाही गुरुवारी ठार मारले. ते दोघे स्थानिक होते.