Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

न्यूझीलंडच्या मशीदीत झालेल्या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू, थोडक्यात बचावली बांगलादेशाची टीम

न्यूझीलंडच्या मशीदीत झालेल्या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू  थोडक्यात बचावली बांगलादेशाची टीम
Webdunia
शुक्रवार, 15 मार्च 2019 (09:11 IST)
न्यूझीलंडच्या एका मशीदीत शुक्रवारी सकाळी झालेल्या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू झाला आहे जेव्हा की बरेच लोक जखमी झाले आहे. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. असे हे सांगण्यात येत आहे की बांगलादेशाची टीम थोडक्यात बचावली.  
 
न्यूझीलंड पोलिसांच्या माहितीनुसार, क्राइस्टचर्चमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. इथे एक शूटर उपस्थित आहे. पोलीस त्याचा सामना करत आहेत. परंतु या गोळीबारात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला, याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. सेंट्रल क्राइस्टर्चच्या प्रशासनानं लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार, मशीदीत ज्यावेळी गोळीबार झाला, तेव्हा तिथे अनेक जण उपस्थित होते. तर शेजारी असलेल्या दुसऱ्या मशीदीला रिकामी करण्यात आलं आहे.
 
बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू तमीम इक्बालाने ट्विट करून सांगितले की, 'गोळीबारात पूर्ण टीम थोडक्यात बचावली. फारच भीतिदायक अनुभव होता.' सांगण्यात येत आहे की घटनेच्या वेळेस बांगलादेशाचे खेळाडू मशीदीतून बाहेर पडण्यास यशस्वी झाले. महत्त्वाचे म्हणजे बांगलादेशाच्या संघाला शनिवारी क्राइस्टचर्चमध्ये सामना खेळायचा आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नीम करोली बाबा हनुमान चालिसा याबद्दल काय म्हणाले होते?

लग्नात नव्या नवरीच्या गळ्यात घातले जाणारे मंगळसूत्र उलटे का असतात जाणून घ्या

२७ फेब्रुवारीनंतर या ३ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकेल ! शुक्र आणि बुध यांच्या युतीने लक्ष्मी नारायण योग तयार होईल

साखर नियंत्रणासाठी ही प्रभावी आसने अवश्य करून पहा

प्रेशर कुकरमध्ये या सात गोष्टी कधीही शिजवू नये, चव आणि गुणवत्ता नष्ट होऊ शकते

सर्व पहा

नवीन

IPL 2025: दिल्ली कॅपिटल्स संघाचा मोठा निर्णय, या अनुभवी खेळाडूकडे सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

विजेंदर सिंग यांनी BFI निवडणुका लवकर घेण्याची मागणी केली

मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत, एलोन मस्क यांनी केला मोठा खुलासा

फिलीपिन्समध्ये आगीमुळे 3 मजली इमारत राख झाली, 8 जणांचा होरपळून मृत्यू

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार! रामदास आठवले म्हणाले

पुढील लेख
Show comments