Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाक पुरवतो दहशतवाद्यांना पैसे!

Webdunia
पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घालण्याची निधी पु‍रविण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबतचे संकेत पाकिस्तानी संकेतस्थळांवरून मिळाले आहेत, असे राष्ट्रीय तपास संस्थेच्या सूत्रांनी सांगितले.
 
सीमेपलीकडून दहशतवादाला आर्थिक पुरवठा करण्यात येत असल्याच्या अरोपांबाबत तपास करीत असताना काही नवीन सूत्रांकडून या बाबतची माहिती मिळाली. या तपासाशी संबंधित एका ‍वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, फळे, सुका मेवा आणि खाद्य पदार्थांची विक्री आणि निर्यात यासंबंधी माहिती देणार्‍या काही पाकिस्तानी संकेतस्थळांनी दहशतवादाला होणार्‍या अर्थपुरवड्यासंबंधी तपासामध्ये सहकार्य केले आहे. 
 
यासंबंधीची कार्यपद्धती आम्हाला लक्षात आली असून, त्यानुसा पाकिस्तानातून एखादा अन्नपदार्थ त्याच्या बाजारातील मूळ किंमतीपेक्षा अत्यंत कमी किमतीत भारतात आयात केला जातो, आणि तो येथे चढ्या भावाने विक्री केली जाते. किमतीतील मोठ्या फरकामुळे मिळालेल्या नफ्याचा पैसा जम्मू- काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना मदत करण्यासाठी ठेवला जातो, असे अधिकर्‍यांनी सांगितले.
 
बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायद्यानुसार डिसेंबर 2016 मध्ये एक तक्रार दाखल केली गेली होती. सीमेपलीकडून व्यापारी मार्गान दहशतवादाला अर्थपुरवठा करण्यात येत असल्यासंदर्भात तपास करण्यासाठी ही तक्रार नोंदविण्यात आली होती. त्याच्या तपासातून ही बाब समोर आली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

लातूरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, एकाला अटक

LIVE: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? शिंदेंच्या 'मोठ्या निर्णया'कडे सर्वांच्या नजरा

मेधा पाटकर यांचा ईव्हीएम वर आरोप,अनेक देशांनी वापर बंद केला म्हणाल्या

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? शिंदेंच्या 'मोठ्या निर्णया'कडे सर्वांच्या नजरा

मुंबईत मुलीला 'डिजिटल अरेस्ट' करून 1.7 लाखांची फसवणूक

पुढील लेख
Show comments