Dharma Sangrah

इंग्लंडमध्ये साजरा होणार 'समोसा वीक'

Webdunia
गुरूवार, 29 मार्च 2018 (09:29 IST)

भारतीय लोकांचा आवडता असलेला गरमागरम आणि खमंग समोसा आता इंग्लंडवासीयांची भूक भागवणार आहे. इंग्लंडच्या लेस्टर शहरात समोसा वीक साजरा केला जाणार आहे. 9 ते 13 एप्रिल दरम्यान इंग्लंडमधल्या खवय्यांना या समोशाचा आस्वाद घेता येणार आहे. दक्षिण आशियातल्या खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी या समोसा वीकचं आयोजन करण्यात आलंय.

मुघलांनी भारतात समोसा आणला असं सांगितलं जातं. भारतीयांनी खुल्या दिलानं त्याचं स्वागत केलं. या समोशानं सगळ्या भारताला एकतेच्या सूत्रात बांधलंय. समोसा मस्तही आणि स्वस्तही आणि पोटभरही. हाच समोसा आता इंग्लंडमध्येही लोकप्रिय होईल, असा अंदाज आहे. 

इंग्लंडमधल्या या समोसा वीकचं आयोजन केलंय 'लेस्टर करी अवॉर्ड'नं. लेस्टर करी अवॉर्डची रोमिला गुलजार ही सामोशाची प्रचंड चाहती. जर जगात बर्गर डे साजरा होऊ शकतो, तर समोसा वीक का नाही, असं तिचं म्हणणं आहे. म्हणूनच तिनं या समोसा वीकचं आयोजन केल आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर उद्या बारामती येथे अंत्यसंस्कार होणार

पहिल्यांदाच रविवारी अर्थसंकल्प सादर केला जाईल आणि शेअर बाजार देखील खुला असेल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्याला धक्का; उद्या बारामतीत अंत्यसंस्कार; महाराष्ट्रात तीन दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर

दारूच्या नशेत माजी भारतीय क्रिकेटपटूची एसयूव्हीला धडक, वडोदरा येथे अटक

Ajit Pawar's Sons अजित पवार यांची मुले: पार्थ आणि जय पवार यांच्याबद्दल सविस्तर माहिती

पुढील लेख
Show comments