काही दिवसांपूर्वी एका ब्रिटिश व्यक्तीने ब्रिटनमधील पंजाबी व्यावसायिकाची तुमच्या डोक्यावर बांधलेली पगडी ही मलमपट्टी केल्यासारखी भासते, अशी हेटाळणी केली होती. त्यावर ब्रिटनस्थित व्यावसायिक रुबेन सिंग यांनी ब्रिटिश व्यक्तीला भलेही तुम्हाला ही पगडी हास्यास्पद वाटू शकते पण आम्हाला आमच्या पेहरावाचा अभिमान आहे. आमच्या संस्कृतीचा ही पगडी एक भाग आहे. पण ती पगडी माझा स्वाभिमानदेखील असल्याचे म्हणत सडेतोड उत्तर दिले होते.
त्याचबरोबर त्यांनी एक आवाहनदेखील पेहरावावरुन कमी लेखणाच्या ब्रिटिश माणसाला दिले. माझ्याकडे माझ्या प्रत्येक पगडीला मॅचिंग गाडी असल्याचे सांगत आपल्या आलिशान रोल्स-रॉयससोबतचे आपले काही फोटो त्यांनी शेअर केले. सोशल मीडियावर आठवडाभर सुरु असलेल्या रुबेन सिंग यांच्या टर्बन चॅलेन्जची जोरदार चार्च पाहायला मिळाली.
दरदिवशी आपल्या आलिशान रोल्स-रॉयसगाडीसोबत एक फोटो रुबेन यांनी सोशल मीडियावर अपलोड केला. आपल्या डोक्यावर असणार्या पगडीला मॅचिंग आलिशान गाडी आपल्याकडे आहे हे त्यांनी यात कमी लेखणार्या माणसाला दाखवून दिल्यामुळे एखाद्याला त्याच्या कपड्यावरुन हिणवणार्या इंग्रजाला चांगलीच चपराक बसली.