Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अबू धाबीच्या राजघराण्याने देशाचं ‘असं’ पालटवलं नशीब; कुटुंबाची संपत्ती 305 अब्ज डॉलर्स

Webdunia
रविवार, 31 डिसेंबर 2023 (10:30 IST)
ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थे च्या रिपोर्टनुसार 2023 या वर्षात जगातील काही श्रीमंत कुटुंबांच्या संपत्तीत एकूण 1.5 ट्रिलियन डॉलर्सची वाढ झाली आहे.
अबू धाबीचं सत्ताधारी शाही कुटुंब अल नाहयान आणि फ्रेंच लक्झरी फॅशन हाऊस हर्मीसच्या मालकाच्या कुटुंबाच्या संपत्तीतही 2023 मध्ये वाढ झाली आहे.
 
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीत या वर्षी प्रथम आलेल्या अबू धाबीच्या राजघराण्यातील अल नाहयान यांची एकूण संपत्ती 305 अब्ज डॉलर आहे.
 
त्यांनी अमेरिकन स्टोअर चेन वॉलमार्टचे मालक वॉल्टन कुटुंबाला 45 अब्ज डॉलरच्या फरकाने मागे टाकलं आहे.
 
गेल्या पाच वर्षांत प्रथमच कोणीतरी वॉलमार्टचे मालक असलेल्या वॉल्टन कुटुंबाला मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे.
 
अल नाहयान शाही कुटुंब केवळ यूएईमधील खनिजतेल समृद्ध राज्य असलेल्या अबू धाबीवरच शासन करत असं नाही, तर सोबत जगातील सर्वात लोकप्रिय फुटबॉल क्लब, मँचेस्टर युनायटेडचेही मालक आहेत.
 
यासोबतच कतारचं अलथानी शाही कुटुंब या यादीत पाचव्या स्थानावर आहे.
 
असं मानलं जातं की ब्लूमबर्गच्या या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या या आखाती प्रदेशातील शाही कुटुंबांच्या संपत्तीबाबत जो अंदाज बांधला आहे, त्या पेक्षा कितीतरी जास्त संपत्ती त्यांच्याकडे आहे.
 
ब्लूमबर्गच्या मते, अबू धाबीच्या या शाही कुटुंबानं चालवत असलेली ट्रेडिंग स्टॉक कंपनी 'इंटरनॅशनल होल्डिंग'चा आकडा गेल्या चार वर्षांत जवळपास सात हजार टक्क्यांनी वाढला आहे.
 
खनिज तेलसंपत्तीनं समृद्ध असलेल्या या आखाती शाही कुटुंबानं आपली केवळ संपत्तीच वाढवली असं नाही, तर या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेची दिशाही बदलली आहे.
 
शाही कुटुंब अल नाहयानचा संक्षिप्त इतिहास
संयुक्त अरब अमिरातीच्या सात राज्यांपैकी एक अबुधाबी, ही देशाची राजधानी आहे.
 
इथे तेलाचे भरपूर साठे आहेत. खनिज तेलाचा शोध लागण्यापूर्वी अनेक दशकांपासून इथे सत्ताधारी अल नाहयान शाही कुटुंब राज्य करत होतं. पण त्याकाळात अबुधाबीचे अल नाहयान शाही कुटुंब इतकं श्रीमंत नव्हतं.
 
संयुक्त अरब अमिराती आणि अल नाहयान शाही कुटुंबाच्या अमिराती ( शासन क्षेत्र किंवा राज्य) ची कथा 1960 च्या दशकात या प्रदेशातील खनिज तेलाच्या शोधापासून सुरू झाली.
पूर्वी या देशातील बहुतांश भागात मूलभूत सुविधांचा अभाव होता. पण तेलाचा शोध लागल्यानंतर लगेचच अबुधाबीचे तत्कालीन आमीन म्हणजे प्रमुख शाह शेख बिन सुलतान अल नाहयान यांनी देशाचं भाग्य बदललं.
 
या प्रदेशातील सर्व अमिरातींना एकत्र केलं आणि संयुक्त अरब अमिराती ( यूएई) नावाचा एक देश बनवला.
 
युएईचे 'राष्ट्रपिता'
शेख जैद बिन सुलतान अल नाहयान त्यांच्या देशाचे 'राष्ट्रपिता' देखील म्हटलं जातं.
 
त्यांना 1971 मध्ये देशाचे राष्ट्रपती बनवण्यात आलं.
 
2004 मध्ये त्यांचा मुलगा शेख खलिफा बिन झैद अल नाहयान यांची वडिलांच्या जागी यूएईचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली.
 
तर ब्रिटनच्या रॉयल मिलिटरी अकादमी, सँडहर्स्ट इथून शिक्षण घेतलेले शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे 2022 मध्ये यूएईचे तिसरे राष्ट्रपती बनले.
 
अल नाहयान शाही कुटुंबातील इतर सदस्य युएईचं सरकार आणि खाजगी क्षेत्रात भूमिका बजावतात.
 
दुबईत बांधलेल्या बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीला संयुक्त अरब अमिरातीचे माजी राष्ट्रपती खलिफा बिन झैद अल नाहयान यांच्या सन्मानार्थ नाव देण्यात आलं आहे.
 
खनिज तेलाचा शोध
अबुधाबीची गणना जगातील सर्वात श्रीमंत शहर आणि राजधानीमध्ये केली जाते.
 
काही काळापूर्वी बीबीसी साउंडशी बोलताना अबू धाबीचे लेखक मोहम्मद अल फहीम म्हणाले होते की, अबू धाबीचे शासक झैद बिन सुलतान होते, ज्यांनी केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे तर प्रदेशाचं नशीब बदललं आहे.
विटनेस हिस्ट्री' या माहितीपटासाठी बीबीसीशी बोलताना ते म्हणाले होते की, खनिज तेलाचा शोध लागण्यापूर्वी इथली लोक मूलभूत सुविधांपासून वंचित होती. लोकांकडे राहण्यासाठी फक्त तंबू होते आणि पिण्याचं शुद्ध पाणी मिळविण्यासाठी मैलांचा प्रवास करावा लागलायचा.
 
तेलाचा शोध लागल्यानंतर अबू धाबीचे शासक शेख झैद बिन सुलतान अल नाहयान यांनी देशात रस्ते, रुग्णालयं आणि इमारती बांधण्यास सुरुवात केली.
 
जेव्हा इंग्रज तिथे पोहचले
त्यांनी स्वतः आपली संपत्ती वाढवली आणि आपल्या जनतेला पैसा कमावण्याची संधी उपलब्ध करून दिली.
 
1960 च्या दशकाच्या शेवटी ब्रिटनने अरब द्वीपकल्पातील देशातील वसाहतींमधून माघार घेण्यास सुरुवात केली होती.
 
शतकापूर्वी इंग्रज तिथे आले होते, जेव्हा काही लढाऊ जमातीच्या टोळ्या तिथून जाणारी मालवाहू जहाजं लुटत असत. इंग्रज त्यांच्यावर ताबा मिळवण्यासाठीच तिथं आले होते. तिथे तेलाचा शोध लागला असला, तरी तिथे राहण्यात फायद्यापेक्षा जास्त धोका ब्रिटिशांना दिसला तेव्हा त्यांनी देश सोडला.
 
इंग्रजांनी देश सोडल्यानंतर दुबई, अबुधाबी, शारजाह, अजमान, उम्मूल कवीन, फुजैराह या सहा अमिरातींच्या शेखांनी त्यांच्या अंतर्गत समन्वयासाठी एक परिषद स्थापन केली.
 
16 जानेवारी 1968 रोजी ब्रिटनने सुएझ आणि आखाती प्रदेशाच्या पूर्वेकडील भागातून माघार घेतल्याची घोषणा केल्यानंतर, शेख झैद बिन सुलतान यांनी इतर अमिरातींशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले.
 
अर्थव्यवस्थेत भांडवली गुंतवणूक
18 फेब्रुवारी 1968 रोजी ते दुबईचे तत्कालीन शासक शेख रशीद बिन सईद अल मकतूम यांच्याशी भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी ताबडतोब दुबईला गेले. दोघांनी त्यांच्यात फेडरेशन करारावर सहमती दर्शविली. ज्यामध्ये फक्त सात अमिरातींचा समावेश असेल. जे या करारात सामील होण्यास तयार होते.
 
अबू धाबीचे तत्कालीन अमीर झैद बिन सुलतान अल नाहयान यांची देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झाली.
पुढे खनिज तेलाचा शोध लागला आणि अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवलं गेलं.
 
संयुक्त अरब अमिरातीच्या निर्मितीमध्ये शेख झैद यांचा पुढाकार हा महत्त्वाचा घटक होता. त्‍यांनी त्‍यांच्‍या सहकारी शासकांमध्‍ये सहमती आणि करार करण्‍यासाठीही पाठिंबा मिळवला.
 
शेवटी, सहा अमिरातींच्या राज्यकर्त्यांनी (रास अल खैमा वगळता) शेख झायेद यांची संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड केली.
 
पर्शियन आखातातील सुन्नी देश
रास अल खैमाह ही अमिराती (राज्य) 10 फेब्रुवारी 1972 रोजी संयुक्त अरब अमिराती म्हणजे यूएईमध्ये सामील झाले.
 
ही प्रक्रिया पर्शियन आखातातील इतर सुन्नी देशांमध्ये (सौदी अरेबिया, ओमान, कतार, बहरीन आणि कुवेत) सारखीच होती.
 
लक्षात घ्यायला हवं की संयुक्त अरब अमिराती हा सात स्वतंत्र राज्यांचा एक देश आहे, ज्यामध्ये अबू धाबी, दुबई, शारजाह, उम्मूल कवीन, फुजैराह, अजमान आणि रास अल खैमाह यांचा समावेश आहे.
 
अबू धाबी हे संयुक्त अरब अमिरातीचे सर्वात मोठे अमिराती म्हणजे राज्य आहे. त्यांनी देशाच्या 84 टक्के भाग व्यापलाय.
 
'Desert Kingdoms to Global Powers: The Rise of the Arab Gulf' मध्ये इतिहासकार रोरी मिलर यांनी दावा केला आहे की, त्या देशांचे प्रचंड आर्थिक यश हे खनिज तेलाचा येणारा नफा भागधारकांमध्ये वाटला जातो आणि अघोषित संपत्ती जसं की रिअल इस्टेट, आर्ट आणि स्टॉक यामध्ये गुंतवणूक करण्याची मोहीम राबवली जात होती.
Published By- Priya Dixit
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

एका पोलीस कर्मचाऱ्याने 60 पुऱ्या खाऊन नवा विक्रम केला

धुळ्यात धनादेशावर बनावट स्वाक्षरी करून 51 लाखांची फसवणूक, 6 जणांवर गुन्हा दाखल

Secular Civil Code लागू करेल मोदी सरकार, पंतप्रधानांनी लोकसभेत घोषणा केली

LIVE: रमेश चेन्निथला 17 डिसेंबरला आमदार आणि उमेदवारांची बैठक घेणार,

रमेश चेन्निथला 17 डिसेंबरला आमदार आणि उमेदवारांची बैठक घेणार, महाराष्ट्राच्या पराभवावर काँग्रेस मंथन करणार

पुढील लेख
Show comments