Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या देशात कार विकत घ्यायला आधी लाखो रुपयांचा परवाना घ्यावा लागतो

Webdunia
गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023 (19:55 IST)
मारिको ओई
सिंगापूरमध्ये जर एखाद्या मोठ्या कुटुंबासाठी कारचा परवाना काढायचा असेल तर तब्बल 1 लाख 46 हजार अमेरिकन डॉलर्स मोजावे लागतात. हेच भारतीय रुपयांमध्ये मोजायचं झाल्यास जवळपास 12 लाख 15 हजार 428 रुपये. आणि हा आकडा आत्तापर्यंतचा उच्चांकी आकडा आहे.
 
गर्दीवर उपाय म्हणून 1990 साली 10-वर्षांच्या हक्क प्रमाणपत्र म्हणजेच परवाना प्रणाली आणण्यात आली होती.
 
सिंगापूरमधील चार चाकी गाड्यांच्या मालकांकडे हा परवाना असणं आवश्यक असतं. शिवाय ज्याला कार खरेदी करायची आहे तो कार बाळगण्यास सक्षम आहे हे दाखवण्यासाठी हा परवाना आवश्यक आहे.
 
दर दोन आठवड्यांनी या परवान्यासाठी बोली लावली जाते. सरकार विक्रीसाठी परवान्याची संख्या नियंत्रित करते.
 
कर आणि आयात शुल्क अशा गोष्टी असतानाच या परवान्यामुळे सिंगापूरमध्ये कार खरेदी करणं महाग झालंय. थोडक्यात सिंगापूर मध्ये कार चालवणं जगात सर्वात महाग आहे.
 
उदाहरण म्हणून बघायचं तर, सिंगापूरमध्ये नव्या टोयोटा कॅमरी हायब्रीडची किंमत आहे सुमारे 2,50,000 युएस डॉलर. यात परवाना, आयात शुल्क आणि सर्व करांचा समावेश आहे. म्हणजे सिंगापूरमध्ये ही कार खरेदी करणं अमेरिकेच्या तुलनेत सहा पटीने महाग आहे.
 
लहान कार, मोटारसायकल आणि व्यावसायिक वाहनांसाठी विविध प्रकारचे परवाने आहेत.
 
या परवान्यांच्या किमतींनी सलग अनेक महिने विक्रमी उच्चांक गाठला आहे, कारण कोरोना साथरोग काळात याची मागणी घटली होती. शिवाय सिंगापूर सरकारने त्याच्या पुढच्या वर्षात परवान्यांवरील सवलत कमी केली.
 
कारसाठी सर्वात कमीतल्या परवान्याचा दर होता 1,04,000 युएस डॉलर. 2020 नंतर तो जवळजवळ तिप्पट झाला आहे. साथरोग काळात मागणी कमी असताना देखील किंमती जास्तच होत्या.
 
इथे एक खुला प्रवर्ग देखील आहे, त्यांना कोणत्याही श्रेणीच्या गाड्या वापरता येतात, त्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. या खुल्या प्रवर्गाने देखील 1,52,000 युएस डॉलरचा विक्रमी उच्चांक गाठला.
 
टोयोटा बोर्नियो मोटर्सच्या अॅलिस चँग यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, नवीन गाड्यांच्या मागणीमुळे परवान्यांच्या किमतीत वाढ होण्याची अपेक्षा होती.
 
त्या सांगतात, "जेव्हाही आमच्याकडे लक्झरी कार असतात तेव्हा ग्राहक आमच्या स्टोअरच्या बाहेर रांगा लावतात."
 
तुलनेने लहान असूनही सिंगापूर मध्ये श्रीमंतांची कमतरता नाही.
 
मात्र सामान्य सिंगापूरकरांचा सरासरी पगार सरासरी 70 हजार युएस डॉलर इतका असतो. जर परवान्यांचे दर इतके अव्वाच्या सव्वा असतील तर त्यांच्यासाठी कार खरेदी करणं अवघड होऊ शकतं.
 
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्यासाठी रहिवाशांना प्रोत्साहित करण्यासाठी सरकार उत्सुक आहे. सिंगापूरच्या वाहतूक व्यवस्थेला जगात सर्वोत्कृष्ट स्थान मिळालं आहे.
 
सुमारे 55 लाख लोकसंख्या असलेल्या या देशात गेल्या वर्षीच्या अखेरीस केवळ 10 लाख खाजगी गाड्या होत्या. यातल्या किती गाड्या कमी होतात यावर नवीन परवान्यांची संख्या अवलंबून असते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

लांडग्यांची दहशत कायम, 11 वर्षाच्या मुलावर हल्ला

मजुरांना घेऊन जाणारी जीप ट्रकला धडकली, 9 जणांचा मृत्यू

आयसीयूमध्ये जाण्यापूर्वी शूज काढायला सांगितल्याने डॉक्टरला मारहाण

महाराष्ट्रात MVA मधील मुख्यमंत्री चेहरा कोण असेल? काय म्हणाले उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात चाकूचा धाक दाखवून महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार

पुढील लेख
Show comments