Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चेतावणी !आता कोरोनाचा लॅम्बडा व्हेरिएंट जगभरात विनाश आणू शकतो, मलेशियाने डेल्टापेक्षा धोकादायक सांगितले

चेतावणी !आता कोरोनाचा लॅम्बडा व्हेरिएंट जगभरात विनाश आणू शकतो  मलेशियाने डेल्टापेक्षा धोकादायक सांगितले
Webdunia
बुधवार, 7 जुलै 2021 (11:49 IST)
कोरोनाचा डेल्टा प्रकार भारतात प्रथम सापडला. या प्रकारामुळे जगभरात संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आणि भारतातील लोकांमध्ये भीतीदायक स्थिती निर्माण झाली. तथापि, आता त्याचा लॅम्बडा व्हेरियंट कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक प्राणघातक असल्याचे सिद्ध होत आहे. मलेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. गेल्या चार आठवड्यात हा प्रकार 30 पेक्षा जास्त देशांमध्ये आढळला आहे. 
 
मलेशियातील आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ट्विट करून याबाबत माहिती दिली. ट्विटनुसार, 'लॅम्बडाचा स्ट्रेन  पेरुमध्ये प्रथम सापडला.पेरू हा जगातला सर्वाधिक मृत्यू दर असलेला देश आहे.
 
ट्विटमध्ये ऑस्ट्रेलियन न्यूज पोर्टल news.com.au ने दिलेल्या वृत्ताबाबत सांगितले आहे, त्यानुसार हा स्ट्रेन  युनायटेड किंगडममध्येही सापडला आहे. 'द स्टार'ने आपल्या बातमीत असे लिहिले आहे की आता संशोधकांना चिंता आहे की हा स्ट्रेन डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक संसर्गजन्य असू शकतो.
 
युरो न्यूजच्या म्हणण्यानुसार, पेरूमध्ये मे आणि जून महिन्यांत 82 टक्के कोरोना नमुन्यांमध्ये लॅम्बडा प्रकार आढळला आहे. त्याच वेळी मे आणि जून दरम्यान दक्षिण अमेरिकेच्या दुसर्‍या देशातील चिलीमधील 31 टक्के घटनांमध्ये हे स्ट्रेन सापडले आहे. 
 
जागतिक आरोग्य संघटनेनेही लॅम्बडा व्हेरियंट बद्दल चिंता व्यक्त केली आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की या प्रकारामुळे केवळ संसर्ग होण्याच्या घटनांमध्येच वाढ होत नाही तर त्याचा अँटीबॉडीज वरही परिणाम होत आहे.
 
दरम्यान, पब्लिक हेल्थ इंग्लंडने लॅम्बडा व्हेरियंटला त्याच्या VUI यादीमध्ये समाविष्ट केले आहे. पीएचईच्या मते, ब्रिटनमध्ये आतापर्यंत लॅम्बडा व्हेरिएंटची 6 प्रकरणे ओळखली गेली आहेत आणि इतर सर्व देशांमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये ही सर्व प्रकरणे आढळली आहेत.
 
तथापि, ब्रिटनच्या आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की लॅम्बडा व्हेरिएंटमुळे गंभीर आजार उद्भवू लागला आहे किंवा लस प्रभावी नाही ,असे सूचित करण्यासाठी कोणतेही पुरावे सध्या उपलब्ध नाहीत. तथापि, पीएचई लॅब व्हायरसमध्ये होणारे बदल समजून घेण्यासाठी चाचणी करण्यात लागलेली  आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: मंत्री धनंजय मुंडे यांनी पदाचा राजीनामा दिला

National Safety Day 2025 राष्ट्रीय सुरक्षा दिवस निबंध

धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वीकारला

औरंगजेबावर वक्तव्य करणारे अबू आझमी कोण आहे? महाराष्ट्रात एफआयआर दाखल

पालघरमध्ये भीषण अपघात, ट्रक-ट्रेलरच्या धडकेनंतर भीषण आग

पुढील लेख