Festival Posters

जगातील सर्वात महागडा घटस्फोट

Webdunia
बुधवार, 10 एप्रिल 2019 (09:15 IST)
जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनचे संस्थापक-सीईओ जेफ बेजोस आणि त्यांची पत्नी मॅकेन्झी यांचा घटस्फोट हा जगातील सर्वात महागडा घटस्फोट ठरलाय. घटस्फोटाची प्रक्रिया पार पडल्यानंतर जेफ यांची (माजी) पत्नी मॅकेन्झी जगातील चौथ्या क्रमांकावरची सर्वात श्रीमंत महिला ठरलीय. बेजोस आणि त्यांच्या पत्नीमध्ये २५ टक्के शेअर्सचा करार झालाय. याद्वारे बेजोस यांनी २.५२ लाख करोडचे शेअर्स पत्नी मॅकेन्झी हिच्याकडे सोपवलेत. त्यानंतर मॅकेन्झी यांच्या नावाची जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत महिला म्हणून नोंद झालीय. करारानुसार, मॅकेन्झी यांनी ७५ टक्के शेअर आणि आपल्याकडील मतदानाचा अधिकारही बेजोस यांना दिलाय.
 
आपल्या घटस्फोटाबद्दल माहिती देत मॅकेन्झी यांनीही एक ट्विट केलंय. 'मी वॉशिंग्टन पोस्ट, ब्लू ओरिजिन आणि अमेझॉनमधील आपला मतदानाचा अधिकार सोडून खुश आहे. या सर्व अविश्वसनीय कंपन्यांना योग्य पद्धतीनं हाताळण्यासाठी मी जेफला हा अधिकार देत आहे. हे माझ्याकडून जेफला समर्थन असेल. मी माझ्या भविष्यासाठीही उत्साहीत आहे. जेफसोबत माझ्या भूतकाळासाठी मी कृतज्ञ आहे आणि येणाऱ्या भविष्यासाठीही आशादायी आहे' असं मॅकेन्झी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

राहुल द्रविडची युरोपियन टी२० प्रीमियर लीगच्या (ETPL) डब्लिन गार्डियन्स फ्रँचायझीचा मालक म्हणून नियुक्ती करण्यात आली

PBKS vs DC: दिल्ली कॅपिटल्सने पंजाबला हरवून गुणतालिकेत बदल घडवला

International Nurses Day 2026: आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन का साजरा केला जातो? इतिहास जाणून घ्या

गुजरातमध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींनी नागरिकांना सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले

महाराष्ट्राच्या सागरी सीमेवर आता ड्रोनद्वारे बारीक नजर ठेवली जाणार, अवैध मासेमारी करणाऱ्यांची आता खैर नाही; मंत्री राणे यांनी आदेश दिले

पुढील लेख
Show comments