Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झाकीर नाईकचा ताबा देणार नाही : मलेशिया

Webdunia
शनिवार, 7 जुलै 2018 (12:32 IST)
इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा संस्थापक व वादग्रस्त धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईक याला भारतात पाठवणार नसल्याचे मलेशियाने स्पष्ट केले आहे. मलेशियाचे पंतप्रधान हातिर मोहमम्द यांनी सांगितले की, नाईकचे प्रत्यार्पण केले जाणार नाही.
 
पंतप्रधान मोहमम्द म्हणाले, 'जोपर्यंत नाईक आमच्या देशात काही समस्या निर्माण करत नाही तोपर्यंत त्याला आम्ही प्रत्यार्पित करणार नाही. कारण त्याच्याकडे मलेशियाचे नागरिकत्व आहे.' भारत आणि मलेशियादरम्यान दहशतवादविरोधी लढ्यासाठी सहकार्य वाढत आहे. तरीही नाईक मलेशियात आसरा घेण्यास यशस्वी झाला. पण पंतप्रधान मोदींच्या 31 मे च्या मलेशिया दौर्‍यानंतर नाईक सोरच्या अडचणी वाढल्या आहेत. चिथावणीखोर भाषण देणार्‍या नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनला 2016 मध्ये बेकायदा घोषित करण्यात आले. झाकीरवर मनी लॉण्डरिंग आणि दहशतवादाचे गंभीर आरोप आहेत. याप्रकरणी एनआयए तपास करत आहे. त्यामुळेच झाकीर मलेशियात पळाला होता.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

परदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा गुन्हा, दोषीला जन्मठेपेची शिक्षा

LIVE: कुर्ला येथे वडिलांनी तीन महिन्यांच्या चिमुरडीला जमीवर आपटत घेतला जीव

महाकुंभ : प्रचंड गर्दीमुळे संगम रेल्वे स्टेशन २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याची चाकूने वार करून हत्या, तीन संशयित ताब्यात

लातूर मध्ये वेगवान एसयूव्ही हॉटेलात शिरली, एकाचा मृत्यू, चार जखमी

पुढील लेख
Show comments