Dharma Sangrah

DC vs LSG : डीसीने रोमहर्षक सामन्यात लखनौचा 19 धावांनी पराभव केला

Webdunia
मंगळवार, 14 मे 2024 (23:38 IST)
आयपीएल 2024 च्या 64 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होत आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्स संघाने लखनौला जिंकण्यासाठी 209 धावांचे लक्ष्य दिले होते. याला प्रत्युत्तर देताना लखनौचा संघ केवळ 189 धावा करू शकला.

लखनौ सुपर जायंट्सकडून निकोलस पुरन आणि अर्शद खान यांनी अर्धशतके झळकावली. मात्र हे दोन्ही खेळाडू आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत. या सामन्यात इशांत शर्माने दिल्ली कॅपिटल्ससाठी चांगली कामगिरी करत तीन बळी घेतले. 
 
आयपीएल 2024 च्या 64 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 19 धावांनी पराभव केला. या विजयासह दिल्लीचा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे.राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. त्याचे 16 गुण आहेत. चेन्नईचे 13 सामन्यांत 14 गुण आणि सनरायझर्स हैदराबादचे 12 सामन्यांत 14 गुण आहेत.दिल्लीने साखळी फेरीत आपली मोहीम संपवली. त्यांनी सात विजय आणि सात पराभवांसह 14 सामन्यांतून 14 गुणांसह आपली मोहीम पूर्ण केली.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 12 गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत आहे. त्याला 18 मे रोजी चेन्नई सुपर किंग्जचा सामना करावा लागणार आहे. हा सामना जिंकणारा संघ प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करू शकतो.
 
Edited by - Priya Dixit
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

रांची वनडेपूर्वी विराट कोहली धोनीच्या घरी डिनर पार्टीला उपस्थित

स्मृती मानधनासोबत वेळ घालवण्यासाठी जेमिमा रॉड्रिग्जने WBBL सोडले

मुंबई इंडियन्सने या खेळाडूला 6 पट किमतीत खरेदी केले

महिला T20लीगचे वेळापत्रक जाहिर

IND vs SA Test "आम्ही एकजूट राहू आणि पुनरागमन करू," दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्लीन स्वीप केल्यानंतर शुभमन गिल म्हणाला

पुढील लेख
Show comments