Dharma Sangrah

MI vs LSG :लखनौने मुंबईचा 18 धावांनी पराभव केला

Webdunia
शनिवार, 18 मे 2024 (08:01 IST)
आज IPL 2024 चा 67 वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. मुंबईने नाणेफेक जिंकून लखनौला प्रथम फलंदाजीची संधी दिली. केएल राहुलच्या सेनेने 20 षटकांत 6 गडी गमावून 214 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने 20 षटकांत 6 गडी गमावून 196 धावा केल्या. लखनौने मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला.
 
आयपीएल 2024 चा 67 वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. केएल राहुलच्या संघाने एमआयचा 18 धावांनी पराभव केला. या स्पर्धेत दोन्ही संघांचा प्रवास संपला. मुंबईचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. 
मुंबई इंडियन्स आठ गुणांसह गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे.  हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने 14 पैकी 10 सामने गमावले.
 
लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने दमदार सुरुवात केली. सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी पहिल्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली, जी नवीन-उल-हकने मोडली. त्याने नवव्या षटकात डेवाल्ड ब्रेविसला बाद केले. त्याला 20 चेंडूत 23 धावा करता आल्या. यानंतर सूर्या खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. तर रोहित शर्माने 68 धावा केल्या. त्याने 178.94 च्या स्ट्राईक रेटने 10 चौकार आणि तीन षटकार मारले. 
 
या सामन्यात हार्दिक पांड्याने 16, नेहल वढेराने एक आणि इशान किशनने 14 धावा केल्या. नमन धीरने लखनौविरुद्ध स्फोटक कामगिरी केली. त्याने 26 चेंडूत झंझावाती अर्धशतक झळकावले. या सामन्यात तो 62 धावा करून नाबाद राहिला. त्याने 221.42 च्या स्ट्राईक रेटने चार चौकार आणि पाच षटकार मारले. रोमारियो शेफर्ड एक धाव घेत नाबाद राहिला. लखनौकडून रवी बिश्नोई आणि नवीन-उलहाकने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर कृणाल पंड्या आणि मोहसिन खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

GG vs DC : दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा डब्ल्यूपीएल फायनलमध्ये, गुजरातचा सात विकेट्सने पराभव

IND A vs USA: सराव सामन्यात भारत अ संघाने अमेरिकेला 38 धावांनी पराभूत केले

T20 World Cup भारत आणि इटलीने सराव सामने जिंकले, पहिल्याच दिवशी या संघांना पराभवाचा सामना करावा लागला

भारताविरुद्ध न खेळण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयावर बीसीसीआयने दिली प्रतिक्रिया

T20 World Cup पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला; आयसीसीच्या नियमांचे पालन करीत टीम इंडिया श्रीलंकेला जाणार

पुढील लेख
Show comments