Festival Posters

गूगलचा चीनला दणका, चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली

Webdunia
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (16:08 IST)
गूगलने चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली आहेत. त्यामुळे चीनला याचा मोठा फटका बसणार आहे. गूगलकडून सांगण्यात आले आहे की, चीनशी संबंधित २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केले आहेत. चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवत असल्याचे कारण देत गूगलकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
 
गूगलने हटविलेले यूट्यूब चॅनेल्स स्पॅमी आणि बिगर राजकीय कंटेन्ट पोस्ट करत होते. तसेच, यामधील काही भाग राजकारणाशी संबंधित होता. दिशाभूल करणारे व्हिडिओ चीनने यूट्यूब प्लॅटफॉर्मवर शेअर केल्याचे कारण देत गूगलने हा व्हिडिओ स्ट्राईक करत २५०० हून अधिक चॅनेल डिलिट केले आहेत. 
 
चॅनेल्स तपासणीच्या कामादरम्यान गूगलला काही व्हिडिओ चॅनेल संदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर गूगलने योग्य ती खातरजमा करुन एप्रिल ते जून या तिमाहीत हे यूट्यूब चॅनेल हटवले आहेत. आपल्या तिमाही अहवालात गूगलने यासंदर्भात माहिती दिली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्राच्या १७ विधान परिषद जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक

वनतारा पुन्हा न्यायालयाच्या परीक्षेत यशस्वी, सर्वोच्च न्यायालयाने नवी याचिका फेटाळली

फुगेवाडी (पिंपरी-चिंचवड) विषारी दारूकांडातील ४ मुख्य आरोपींना ८ जून पर्यंत पोलीस कोठडी

एक्सप्रेसवर दगडफेक केल्यास आता कारवाई होणार; रेल्वे आकाशातून निगराणी करणार

आठ बछड्यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय उद्यान गीरमधील सिंहांना रोगाचा धोका, वन विभागाचा सतर्कतेचा इशारा

पुढील लेख
Show comments