Festival Posters

हे 5 अॅप्स वाचतात आपले खाजगी व्हाट्सअॅप संदेश

Webdunia
आपल्यामधून अधिकश्या लोकं सोशल मेसेज अॅप व्हाट्सअॅप वापरत असतील. यापैकी बरेच लोक अँड्रॉइड वापरत असतील आणि बरेच लोक आयफोन. आपण अँड्रॉइड वापरकर्ता असल्यास, आपल्याला खूप सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, कारण 5 अशा अॅप्सची उघडकीस आले आहे जे आपले सर्व व्हाट्सअॅप संदेश गुप्तपणे वाचत आहे. हे अॅप्स प्ले स्टोअरद्वारे लोकांच्या फोनवर पोहोचले आहे. चला या अॅप्सबद्दल आणि त्यांपासून बचावाबद्दल जाणून घ्या
 
असे 5 गुप्तचर अॅप्स गुगल प्ले स्टोअरवर ओळखले गेले आहेत, ज्यांना 100,000 पेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केले आहे. या अॅप्सचे नावे Flappy Birr Dog, FlashLight, HZPermis Pro Arabe, Win7imulator, Win7Launcher आहे. या अॅप्सने सुमारे 200 देशांतील लोकांना प्रभावित केले आहे आणि सुरक्षा एजन्सींना संशय आहे की या अॅप्सद्वारे लोकांचे वैयक्तिक व्हाट्सअॅप संदेश वाचले गेले आहे. या अॅप्सद्वारे प्रभावित झालेल्या लोकांची संख्या सर्वाधिक भारतात आहे. सुरक्षा संशोधक Trend Micro यांनी हे उघड केले आहे. 
 
यातील अॅप्स आपल्या फोनमध्ये इंस्टॉल झाल्याबरोबर यात असलेले MOBSTSPY सर्वात आधी इंटरनेट कनेक्शन तपासून हॅकर्सच्या सर्व्हरशी कनेक्ट करतं. यानंतर हॅकर्सच्या सर्व्हरपर्यंत हे अॅप्स आपल्या फोनमधील भाषा, देश, मोबाइल कंपनीचे नाव यासारख्या माहिती प्रसारित करतात. 
 
संशोधक दावा करतात की असे अॅप्स आपल्या फोनमध्ये आढळणारी कोणतीही माहिती चोरी करू शकतात. हे अगदी सोप्यारीत्या संपर्क नंबर, मोबाइल नंबर, खाजगी संदेश, व्हिडिओ, फोटो, व्हाट्सअॅप संदेश इत्यादी चोरी करू शकतात. तर आपल्या फोनमध्ये असे अॅप्स असल्यास, त्यांना त्वरित हटवा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

'ट्रम्प यांच्यावर झालेला गोळीबार हा त्यांच्याच कृत्यांचा परिणाम आहे; भारतातील जनतेचीही तीच भावना आहे' — काँग्रेस आमदाराचे वादग्रस्त विधान

Thane Weather Alert प्रचंड उकाडा आणि दमटपणामुळे नागरिक हैराण; प्रशासनाकडून इशारा जारी

LIVE: रोहित पवार यांची बागेश्वर बाबांवर टीका

रोहित पवार यांची बागेश्वर बाबांवर टीका, स्वतःचे मुलं जन्माला घाला

धावत्या ट्रेनच्या स्लीपर कोचला अचानक आग, प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या घेतल्या

पुढील लेख
Show comments