Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जिओ ट्रू 5G ‘वेलकम-ऑफर’फक्त इनव्हीटेशनवर

Webdunia
बुधवार, 5 ऑक्टोबर 2022 (10:16 IST)
• बीटा चाचणी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी येथून सुरू होणार
•मुंबई,  जिओ ट्रू 5G ‘वेलकम-ऑफर’फक्त इनव्हीटेशनवर
• फक्त निवडक जिओ वापरकर्त्यांना दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी येथे इनव्हीटेशन मिळतील
• ऑफरमध्ये, वापरकर्त्यांना 1Gbps पर्यंत स्पीड आणि अमर्यादित 5G डेटा मिळेल
• जिओ ट्रू 5G ही जगातील सर्वात प्रगत 5G सेवा असल्याचे मानले जाते.
जिओ वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रिलायन्स जिओच्या ट्रू-५जी सेवेची बीटा चाचणी दसऱ्यापासून सुरू होत आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी या देशातील चार शहरांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. सध्या, ही सेवा आमंत्रणावर आहे, म्हणजेच विद्यमान जिओ वापरकर्त्यांमधून काही निवडक वापरकर्त्यांना ही सेवा वापरण्यासाठी आमंत्रण पाठवले जाईल.
 
यासोबतच यूजर्सना वेलकम ऑफर देखील मिळेल, ज्या अंतर्गत यूजर्सना 1Gbps पर्यंत स्पीड आणि अमर्यादित 5G डेटा मिळेल. आमंत्रित वापरकर्ते जिओ ट्रू 5G सेवेचा अनुभव घेतील आणि त्यांच्या अनुभवांवर आधारित, कंपनी एक सर्वसमावेशक 5G सेवा सुरू करेल.
“वी केअर” म्हणजे आम्ही तुमची काळजी घेतो, या मूळ मंत्रावर जिओ चा ट्रू 5G आधारित आहे. यामुळे शिक्षण, आरोग्यसेवा, कृषी, कौशल्य विकास, लघु, मध्यम आणि मोठे उद्योग, आय ओ टी, स्मार्ट होम आणि गेमिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये पूर्णपणे परिवर्तन येईल आणि 140 कोटी भारतीयांवर त्याचा थेट परिणाम होईल.
 
जिओ ट्रू 5G वेलकम ऑफर:
1. जिओ ट्रू 5G वेलकम ऑफर दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी येथील जिओ वापरकर्त्यांसाठी आमंत्रणाद्वारे सुरू केली जात आहे.
2. या ग्राहकांना 1 Gbps+ पर्यंत स्पीडसह अमर्यादित 5G डेटा मिळेल
3. शहरे तयार झाल्यावर, इतर शहरांसाठी बीटा चाचणी सेवा जाहीर केली जाईल
4. शहराचे नेटवर्क कव्हरेज पुरेसे मजबूत होईपर्यंत वापरकर्ते या बीटा चाचणीचा लाभ घेऊ शकतील.
5. आमंत्रित ‘जिओ वेलकम ऑफर’ वापरकर्त्यांना त्यांचे विद्यमान जिओ सिम बदलावे लागणार नाही. फक्त त्याचा मोबाईल 5G असावा. जिओ ट्रू 5G सेवा आपोआप अपग्रेड होईल.
6. जिओ सर्व हँडसेट ब्रँडसह देखील काम करत आहे जेणेकरून ग्राहकांना निवडण्यासाठी 5G उपकरणांची विस्तृत श्रेणी उपलब्ध असेल.
 
यावेळी, रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले, “आमच्या पंतप्रधानांच्या आवाहनावर, जिओने भारतासारख्या मोठ्या आकाराच्या देशासाठी सर्वात वेगवान 5G रोल-आउटची योजना तयार केली आहे. जिओ 5G हा खरा 5G आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की भारत जिओ ट्रू 5G पेक्षा कमी पात्र नाही. जिओ 5G हे जगातील सर्वात प्रगत 5G नेटवर्क असेल, जे भारतीयांनी भारतीयांसाठी तयार केले आहे.”
 
श्री अंबानी पुढे म्हणाले, “5G ही काही विशेषाधिकार प्राप्त लोकांसाठी किंवा फक्त मोठ्या शहरांसाठी उपलब्ध असलेली सेवा असू शकत नाही. ती भारतातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक घर आणि प्रत्येक व्यवसायासाठी उपलब्ध असली पाहिजे. तरच आपण आपल्या अर्थव्यवस्थेत उत्पादकता, कमाई आणि राहणीमानात मूलभूत बदल घडवून आणू शकतो.”
 
 जिओ ट्रू 5G ची 3 मोठी वैशिष्ट्ये:
स्टँड-अलोन 5G
हे एक स्वतंत्र नेटवर्क आहे म्हणजेच या प्रगत 5G नेटवर्कचा 4G नेटवर्कशी काहीही संबंध नाही. इतर ऑपरेटर 4G-आधारित नेटवर्क सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा थेट फायदा जिओ च्या ट्रू 5G ला मिळणार आहे. यात कमी लेटन्सी, मोठ्या प्रमाणात मशीन-टू-मशीन कम्युनिकेशन, 5G व्हॉइस, एज कॉम्प्युटिंग आणि नेटवर्क स्लाइसिंग यासारखी उत्कृष्ट वैशिष्ट्ये आहेत.
 
स्पेक्ट्रमचे सर्वात मोठे आणि सर्वोत्तम मिश्रण
5G स्पेक्ट्रम बँड, 700 MHz, 3500 MHz आणि 26 GHz चे सर्वात मोठे आणि सर्वात योग्य मिश्रण, जिओ ट्रू 5G ला इतर ऑपरेटर्सच्या तुलनेत मात देते. दुसरे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 700 मेगाहर्ट्झ लो-बँड स्पेक्ट्रम असणारा जिओ हा एकमेव ऑपरेटर आहे. यामुळे चांगले इनडोअर कव्हरेज प्राप्त होते. युरोप, यूएस आणि यूकेमध्ये हा बँड 5G साठी प्रीमियम बँड मानला जातो.
 
कॅरिअर एग्रीगेशन
कॅरिअर एग्रीगेशन नावाचे प्रगत तंत्रज्ञान 5G फ्रिक्वेन्सीचा मजबूत “डेटा महामार्ग” तयार करते. जे वापरकर्त्यांसाठी कव्हरेज, क्षमता, गुणवत्ता आणि किफायतशीरतेचे उत्तम पॅकेज आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments