rashifal-2026

भारतात फक्त 36 टक्के लोकच करतात इंटरनेटचा वापर, टॅबलेट यूजरची संख्या फक्त एक टक्के

Webdunia
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019 (13:00 IST)
संपूर्ण जगाच्या तुलनेत सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक भारताकडे आहे, पण एक कडू सत्य म्हणजे भारतातील दोन तृतियांश लोक इंटरनेट वापरत नाहीत. याची माहिती इंटरनेट ऍड असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) ने आपल्या एका रिपोर्टमध्ये दिली आहे.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की भारतात फक्त 36 टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात, जेव्हा की अमेरिका, तुर्की, चीन आणि रशियात ही संख्या क्रमशः 86, 83, 60 आणि 76 टक्के आहे. सांगायचे झाले तर भारतात एकूण इंटरनेट यूजर्सची संख्या 45.1 कोटी एवढी आहे. 

फक्त 33 टक्के स्त्रिया करतात इंटरनेटचा वापर
रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की संपूर्ण भारतात फक्त 33 टक्के स्त्रियाच इंटरनेटचा वापर करतात, तसेच रिपोर्टमध्ये असे देखील सांगण्यात आले आहे की 38 टक्के शहरी स्त्रिया आणि 28 टक्के ग्रामीण स्त्रिया इंटरनेटचा वापर करतात. तसेच पुरुषांबद्दल बोलायचे झाले तर संपूर्ण देशात 67 टक्के पुरुष इंटरनेटचा वापर करतात, तसेच शहरात यांची संख्या 62 टक्के आणि गावात 72 टक्के आहे.
 
सर्वात जास्त 4जी कनेक्शन
IAMAI ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की भारतात इंटरनेट वापर करणार्‍यांमध्ये सर्वात जास्त अर्थात 86 टक्के लोक 4जी नेटवर्क वाले आहे, जेव्हाकी 13 टक्के लोक 3जी नेटवर्क, 4 टक्के लोक 2जी नेटवर्क आणि 6 टक्के लोक वाय फायच्या माध्यमाने इंटरनेटचा वापर करतात. 

मोबाइल हे सर्वात मोठे शस्त्र आहे
IAMAI चे मानणे आहे की 99 टक्के यूजर मोबाइलवर इंटरनेटचा वापर करतात. तसेच लॅपटॉपवर इंटरनेट वापर करणार्‍यांची संख्या 6 टक्के, डेस्कटॉपवर 4 टक्के आणि टॅबलेटवर फक्त 1 टक्के आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईची मतदार यादी वादग्रस्त म्हणत विरोधकांनी केला हल्लबोल

अमरावतीच्या तिवासा तहसीलमधील शिवणगाव-बेनोडा भागात भूकंपाचे धक्के जाणवले

पटणामध्ये तिहेरी हत्याकांड; व्यापाऱ्याची हत्या केल्यानंतर पळून जाणाऱ्या गुन्हेगारांना लोकांनी बेदम मारहाण करून केले ठार

हवामान पुन्हा बदलेल? चक्रीवादळाचा धोका; या राज्यांमध्ये आयएमडीचा इशारा

पाकिस्तानमध्ये मुलांनी रॉकेटला खेळणे समजून उचलले, स्फोट होताच तीन जण ठार

पुढील लेख
Show comments