Festival Posters

Tiktok मध्ये नवीन सुरक्षा फीचर

Webdunia
मंगळवार, 12 मार्च 2019 (18:26 IST)
टिकटॉकवर क्रिएटिव्ह व्हिडिओ तयार करून लोक त्यांच्या मित्र आणि इतर टिकटॉक वापरकर्त्यांमध्ये वेगळी ओळख बनवत आहे. भारतात 5.4 कोटी मासिक सक्रिय वापरकर्ते असलेला हा प्लॅटफॉर्म देखील इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणे ट्रोलिंग माध्यम बनत आहे.
 
आपल्या खातेधारकांना यापासून वाचवण्यासाठी टिकटॉकने एक सुरक्षा फीचर आणला आहे, याचे नाव आहे - फिल्टर कमेंट्स. त्यात खातेधारकांना आपल्या व्हिडिओवर मिळालेल्या कमेंट्समधून अपमानजनक भाषा काढून टाकण्याचा अधिकार मिळेल. टिकटॉकने खातेधारकांना हिंदी आणि इंग्रजी भाषेतील तीस शब्दांना स्वतः परिभाषित करण्याची संधी दिली आहे, खातेधारक तीस शब्द निवडून त्यांना ते फिल्टर कमेंट्स फीचरसह वापरू शकतात. 
 
टिकटॉक स्वामित्व असलेली कंपनी बाइटडॉन्सने सांगितले की फिल्टर कमेंट्स फीचर लागू झाल्याबरोबर कोणत्याही कमेंटवरून स्वपरिभाषित शब्द आपोआप हटविले जातील. टिकटॉक ने हे पाऊल #सेफहमसेफइंटरनेट मोहिमेखाली घेतला आहे. ही मोहीम कंपनीने 4 फेब्रुवारी रोजी 'सुरक्षित इंटरनेट डे' वर लॉन्च केली होती. सध्या या अॅपच्या वर्तमान गोपनीयता आणि सुरक्षा सेटिंग्ज अंतर्गत वापरकर्त्यास अधिकार आहे की त्यांच्या व्हिडिओला कोण प्रतिसाद देऊ शकेल, कोण त्यांना संदेश पाठवू शकेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सरकारचा मोठा निर्णय मनरेगाचे नाव बदलून 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' केले

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹165 कोटींचा घोटाळा, सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

पुढील लेख
Show comments