Festival Posters

फोटोशॉप... आता मोबाइलवर!

Webdunia
गुरूवार, 12 डिसेंबर 2019 (15:05 IST)
मुलांनो, 'फोटोशॉप' यासॉफ्टवेअरचा वापर डेस्कटॉपवर केला जातो. या सॉफ्टवेअरमुळे फोटोंना वेगवेगळे इफेक्ट्‌स देता येतात. अगदी साधासा वाटणारा फोटोही फोटोशॉपमुळे वेगळा दिसू लागतो. पण मोबाइलमध्ये काढलेल्या फोटोंचे काय? हे फोटो एडिट करण्यासाठी किंवा त्यांना इफेक्ट देण्यासाठी वेगवेगळी अ‍ॅप्स आहेत. पण फोटोशॉपची कियमाच न्यारी! म्हणूनच 'अ‍ॅडोब'ने फोटोशॉपचं मोबाईल अ‍ॅप तयार केलं आहे. हे अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर मोबाइलमधल्या फोटोंना भन्नाट इफेक्ट्‌स देता येतील.
 
या अ‍ॅपमध्ये 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. फोटोशॉपच्या अ‍ॅपमुळे यूजर्स नैसर्गिक आणि क्रिएटिव्ह असे दोन्ही प्रकारचे फोटो काढू शकतील. शिवाय एडिट आणि शेअर करण्याची सोयही यात असेल. या अ‍ॅपमध्ये 'अ‍ॅडॉब सेन्सी' बसवण्यात आलं आहे. यामुळे अ‍ॅपला फोटोत नेमकं काय आहे हे अगदी पटकन लक्षात येईल. हे अ‍ॅप यूजरला वेगवेगळ्या सूचनाही देईल. फोटो ढल्यानंतर मूळ फोटो सेव्ह होतो आणि त्याच फोटोच्या प्रतीला निरनिराळे इफेक्ट्‌स दिले जातात. या अ‍ॅपच्या माध्यमातून अ‍ॅडॉबला फोटोशॉप सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. फोटोशॉपच्या मोबाइल अ‍ॅपमुळे फोटोंना अगदी झपपट इफेक्ट देणं शक्य होणार आहे.
 चिन्मय प्रभू 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

मुंबईत घरोघरी गॅस सिलिंडर चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली

ठाण्यातील 'भोंदू बाबा ने केली काळ्या जादूच्या नावाने १.६६ कोटी रुपयांची फसवणूक

LIVE: सुनेत्रा पवार यांचा बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

KKR vs PBKS : रहाणेने नाणेफेकीत विजय मिळवून ईडन गार्डन्सवर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

सामान्य पावसामुळे पुण्यात पाणी साचले, आदित्य ठाकरे यांचा 'ट्रिपल इंजिन' सरकारवर हल्लाबोल

पुढील लेख
Show comments