Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पहिल्या वर्धापनदिनानिमित्त रियलमीच्या जबरदस्त ऑफर

पहिल्या वर्धापनदिनानिमित्त रियलमीच्या जबरदस्त ऑफर
Webdunia
गुरूवार, 2 मे 2019 (09:52 IST)
चीनची कंपनी रियलमी (Realme) ने पहिल्या वर्धापनदिनानिमित्त जबरदस्त ऑफर दिल्या आहेत. 2 ते 4 दरम्यान या सेलिब्रेशनचं आयोजन करण्यात आलंय. विविध वस्तूंच्या सेलमध्ये कंपनी स्मार्टफोनवर भरघोस सूट देणार आहे. हा सेल कंपनीची अधिकृत वेबसाईट realme.com, फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि कंपनीच्या ऑफलाईन स्टोअरमध्येही मिळेल. एक रुपयात सुपर डिलचीही ऑफर देण्यात आली आहे, ज्यामध्ये Realme 2 Pro, Realme C1, Realme U1, Realme earbuds आणि Realme Tech Backpack यांचा समावेश आहे.
 
एक रुपयांच्या सुपर डिल फीस्टमध्ये मिडनाईट बफे, हेल्दी ब्रेकफास्ट, लंच आणि फाईन डिनर यांचा समावेश आहे. ही ऑफर सेलच्या तीन दिवसांमध्ये रात्री 12 वाजता, सकाळी 9 वाजता, दुपारी 12 वाजता आणि रात्री 8 वाजता ओपन होईल. 2 मे रोजी Realme Pro 2 चे 10 पीस, Realme इयरबड्सचे 100 पीस आणि बॅकपॅक (बॅग) चे 60 पीस सेलमध्ये उपलब्ध असतील. तर 3 मे रोजी एक रुपयाच्या डिलमध्ये Realme C1 चे 20 पीस, Realme इयरबड्सचे 100 पीस आणि बॅकपॅक (बॅग) चे 60 पीस सेलमध्ये उपलब्ध असतील. तर सेलच्या अखेरच्या दिवशी म्हणजे 4 मे रोजी Realme U1 चे 20 पीस, Realme इयरबड्सचे 100 पीस आणि बॅकपॅक (बॅग) चे 60 पीस सेलमध्ये उपलब्ध असतील.
 
या शिवाय कंपनी आपल्या सेलिब्रेशन सेलमध्ये Realme 2 Pro आणि Realme U1 वर 1,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह एक्सटेंडेड वॉरंटी देणार आहे. कंपनी 2 मे रोजी को Realme 3 या फोनचं 3GB रॅम आणि 64GB स्टोरज व्हेरिएंट लाँच करणार आहे. या व्हेरिएंटची किंमत 9999 रुपये असेल. या सेलमध्ये जे ग्राहक MobiKwik चा वापर करुन फोन करेदी करतील त्यांना 15 टक्के (1500 रुपयांपर्यंत) डिस्काऊंट दिला जाणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

'जर त्यांनी भाजपचा पर्दाफाश केला तर...', सुशांत प्रकरणात संजय राऊत म्हणाले- उद्धव यांनी नारायण राणेंना फोन केला नाही

Kunal Kamra's Controversy जे अधिकारात आहे चे बोलले पाहिजे- कुणाल कामराच्या वादग्रस्त गाण्यावर अजित पवार काय म्हणाले?

रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची संभाजीराजे छत्रपती यांची मागणी

बस चालवताना आयपीएल क्रिकेट सामना पाहिल्यामुळे ई-शिवनेरीच्या बस चालकाला निलंबित केले

महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी रोडमॅप तयार ,मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान

पुढील लेख
Show comments