Marathi Biodata Maker

WhatsApp चा Message Yourself फीचर जाणून घ्या उपयोग

Webdunia
सोमवार, 5 डिसेंबर 2022 (13:21 IST)
WhatsApp वेळोवेळी नवीन फिचर्स आणत असतो. नवीन फिचर्समुळे यूजर्सला अॅप वापरणे अधिकच सोयीस्कर होतं. अलीकडेच WhatsApp ने आपल्या प्लॅटफॉर्मवर नवीन फीचर जोडले आहे. या फीचरमुळे आता यूजर्स 1:1 चॅट करु शकतील आणि स्वत:ला महत्त्वाचे मेसेज, डॉक्युमेंट्स आणि रिमाइंडर्स देखील पाठवू शकतील. या फीचरचा फायदा Android आणि iPhone दोन्ही यूजर्सला होणार आहे. तर चला जाणून घेऊया की या फीचरचा फायदा आपण कशाप्रकारे घेऊ शकता-
 
या प्रकारे करा WhatsApp Mesaage Yourself Feature चा वापर
जर आपण WhatsApp Mesaage Yourself Feature वापरु इच्छित असाल तर सर्वात आधी Play Store किंवा App Store हून व्हाट्सअॅप लेटेस्ट अपडेट डाउनलोड करा.
 
नंतर याला उघडा आणि क्रिएट न्यू चॅटवर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर आपल्या कॉन्टॅक्ट्समध्ये स्वत:चा मोबाईल नंतर दिसेल.
आता आपल्याला स्वत:चा नंबर निवडायचा आहे.
आता यावर आपण मेसेज करु शकता.
 
डेस्कटॉप आणि वेबवर देखील लवकरच उपलब्ध होणार हा फीचर
WhatsApp चा हा नवीन फीचर लवकरच डेस्कटॉप व्हर्जन आणि वेब व्हर्जनसाठी उपलब्ध असेल. यूजर्स हे फीचर सर्व कनेक्टेड डिव्हाइसवर सोबत बघू शकतील. आधी यूजर्सला स्वत:ला मेसेज करण्यापूर्वी एक ग्रुप क्रिएट करावं लागतं होतं आणि आणि ग्रुप मेंबर्स जोडावे लागत होते. नंतर ग्रुपमध्ये जोडलेले यूजर्स ग्रुपमधून काढावे लागत होते. तेव्हा हे या फीचरचा वापर करता येत होता. परंतु व्हाट्सअॅपच्या या फीचरमुळे यूजर्स आता सोप्यारीत्या याचा वापर करु शकतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

पाकिस्तान आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

Legislative Council elections भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

महाराष्ट्र सरकारने १,००० गावांमध्ये एआय प्रणाली लागू करून मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले

धक्कादायक : धुळे येथे रुग्णवाहिकाचा वापर करून गोवंशाची तस्करी करण्याचा प्रयत्न

पुढील लेख
Show comments