Dharma Sangrah

कारगिल विजय दिवसाचे 21 वर्ष, 10 गोष्टींनी जाणून घेऊ या कारगिलमधील भारताची पाकिस्तानवर विजयाबद्दलची कहाणी ....

Webdunia
गुरूवार, 23 जुलै 2020 (15:51 IST)
देश आज कारगिलवरील विजयाचा 21 वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. वर्ष 1999 रोजी आजच्या दिवशी भारताच्या शूर मुलांनी कारगिलच्या शिखरावरून पाकिस्तानी सैन्याला पाठलाग करत तिरंगा झेंडा फडकवला होता. या 10 गोष्टींमधून जाणून घ्या कारगिल युद्धाची वीर कथा...
* भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 मध्ये कारगिलचे युद्ध झाले होते. 8 मे 1999 रोजी जेव्हा पाकिस्तानचे सैनिक आणि काश्मिरी अतिरेकी कारगिलच्या शिखरांवर दिसलेले असताना या युद्धाची सुरुवात झाली होती.
* कारगिलमध्ये घुसखोरीची माहिती सर्वप्रथम ताशी नामग्याल नावाच्या एका स्थानिक मेंढपाळाने दिली, जे कारगिलातील बाल्टिक सेक्टरमध्ये आपल्या नवीन याकाचा शोध घेत होते. याकच्या शोध घेण्याच्या दरम्यान त्यांना संशयास्पद पाक सैनिक दिसून आले.
* 3 मे रोजी प्रथमच भारतीय सैनिकांना गश्त(फेरी )मारत असताना आढळले की काही लोकं तेथे हालचाल करीत आहे. प्रथमच द्रास, काकसार आणि मुश्कोह सेक्टर मध्ये पाकिस्तानी घुसखोरांना बघितले.
 * भारतीय सैन्याने 9 जून रोजी बाल्टिक क्षेत्राच्या 2 चौकीवर ताबा घेतला. त्यानंतर 13 जून रोजी द्रास सेक्टरमध्ये तोलोलिंगवर ताबा घेतला. आपल्या सैन्याने 29 जून रोजी दोन अन्य महत्त्वाच्या चौक्या 5060 आणि 5100 आणि वर ताबा मिळवून आपला झेंडा रोविला.
* 11 तासाच्या लढानंतर पुन्हा एकदा टायगर हिल्स वर भारतीय सैन्याने ताबा घेतला, मग बटालिकातील जुबेर हिल देखील ताब्यात घेतली.
* 1999 मध्ये कारगिल युद्धात आर्टिलरी तोफेमधून 2,50,000 गोळे आणि रॉकेट डागळे गेले. 300 पेक्षा जास्त तोफ आणि मोटार आणि रॉकेटलॉन्चर्स ने दररोज सुमारे 5,000 बॉम्बं डागण्यात आले.
* 26 जुलै 1999 रोजी भारतीय सैन्याने कारगिल युद्धाच्या वेळी राबविलेल्या 'ऑपरेशन विजय' ला यशस्वीरीत्या पार पाडून घुसखोरांच्या तावडीतून भारतभूमीला मुक्त केले.
* कारगिलची उंची समुद्र तळापासून सुमारे 16,000 ते 18,000 फूट अशी आहे, अशामध्ये विमानांना उड्डाण करण्यासाठी सुमारे 20,000 फुटाच्या उंची वर उड्डाण करावी लागते.
 * कारगिल युद्धात मीराजसाठी निव्वळ 12 दिवसात लेजर गाईडेड बॉम्बं प्रणाली (लेजर मार्गदर्शित बॉम्बं प्रणाली) तयार करण्यात आली. भारतीय वायू सेनेत पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात मिग-27 आणि मिग-29 विमान वापरण्यात आले होते.
* कारगिलच्या टेकड्यांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धात सुमारे 2 लक्ष भारतीय सैनिकांनी सहभाग घेतला यामध्ये सुमारे 527 सैनिक हुतात्मा झाले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

प्रयागराजमध्ये हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान तलावात कोसळले

LIVE: मनसेने शिंदेंना पाठिंबा दिल्यामुळे भडकले संजय राऊत

मनसेने शिंदेंना पाठिंबा दिल्यामुळे भडकले संजय राऊत; राज ठाकरेंना काँग्रेससारखे धाडस दाखवण्यास सांगितले

मनोरुग्ण तरुणाच्या हल्ल्यात दोन वृद्धांचा मृत्यू, संतप्त जमावाने आरोपीला केली मारहाण; वर्धा मधील घटना

पालघर: साप तस्करी प्रकरणात तीन आरोपींना अटक, वाहन आणि सरपटणारे प्राणी जप्त

पुढील लेख
Show comments