Festival Posters

अनिल गोटे यांचा भाजपला जय महाराष्ट्र लढणार अपक्ष लोकसभा

Webdunia
मंगळवार, 9 एप्रिल 2019 (09:12 IST)
धुळे जिल्ह्यातील नाराज आमदार अनिल गोटेंनी भाजप पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला असून, अनिल गोटेअपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे धुळ्यात भाजपाचे नेते आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या अडचणी वाढणार असून त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.
 
काही महिन्यांपासून अनिल गोटे पक्षावर नाराज होते. त्यामुळेच त्यांनी आज पक्ष सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला आहे. विधानसभेच्या अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा पाठवला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असून, त्यामुळे भाजपाचे उमेदवार सुभाष भामरे यांना आव्हान निर्माण झाले आहे. गोटे यांना स्थानिक राजकारणात  महत्त्वं दिलं जात नसल्यानं गोटे पक्षापासून दूर गेले होते. जलसंपदा गिरीश महाजन यांच्या वाढत्या प्राबल्यामुळे गोटे नाराज होते. डिसेंबरमध्ये झालेल्या धुळे महापालिकेच्या निवडणुकीत गोटे यांनी लोकसंग्राम पक्षाची स्थापना करत उमेदवार उभे केले. मात्र त्यात त्यांना अपयश आलं आणि भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं. यानंतर गोटे पक्षापासून आणखी दूर गेले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

बडगाममध्ये १२ वर्षीय मुलीवर बलात्कार आणि हत्या; मृतदेह घरापासून २०० मीटर अंतरावर आढळला

दुर्दैवी घटना: खेळता-खेळता बाथरूममध्ये गेली, बादलीत पडून १ वर्षाच्या चिमुकलीचा बुडून मृत्यू

MI vs RR : राजस्थान रॉयल्सने मुंबईला ३० धावांनी हरवून प्लेऑफमध्ये प्रवेश केला; पंजाब-KKR स्पर्धेतून बाहेर

WHO चा गंभीर इशारा! इबोलाच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरू

LIVE: नागपूर लॉजिस्टिक्स हब बनेल

पुढील लेख
Show comments