Marathi Biodata Maker

भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या पत्नी धनश्री यांचा अर्ज का झाला बाद

Webdunia
शनिवार, 6 एप्रिल 2019 (12:34 IST)
अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी ३१ उमेदवारांनी एकूण ३८ अर्ज दाखल केले होते. अर्जांची  झालेल्या छाननीमध्ये २६ उमेदवार निवडणुकीसाठी वैध ठरले आहेत.धनश्री विखे यांचा अर्ज भाजपकडून मूळ उमेदवार वैध ठरल्यामुळे, दहा सूचकांची नावे नसल्याने अवैध ठरला. सुदर्शन शितोळे यांनी परिपूर्ण शपथपत्र दाखल केले नाही.भागवत गायकवाड यांचे सर्व सूचक अहमदनगर मतदारसंघातील नाहीत. विलास लाकूडझोडे यांनी अनामत रक्कमच भरली नाही. जाकीर शेख व पोपटराव दरेकर यांना सूचकच नव्हते. भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. पण आता निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज अवैध ठरवला आहे. त्यामुळे आता धनश्री विखे-पाटील यांना ही निवडणूक लढवता येणार नाही.मात्र कॉंग्रेस मधून बंडखोरी केलेले सुजय विखे यांच अर्ज वैध ठरला आहे.
 
सुजय विखे (भारतीय जनता पार्टी), पोपटराव गंगाधर दरेकर (क्रांतिकारी जयहिंद सेना), सुदर्शन लक्ष्मण शितोळे (हिंदू एकता आंदोलन पक्ष), जाकीर रतन शेख (भारतीय मायनॉरीटीज सुरक्षा महासंघ), भागवत धोंडिबा गायकवाड (अपक्ष), विलास सावजी लाकूडझोडे (अपक्ष) यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले.यापैकी सुदर्शन लक्ष्मण शितोळे यांचा अपक्ष अर्ज वैध ठरला, तर पक्षाकडून सादर केलेला अर्ज अवैध ठरला. इतर पाच उमेदवारांचे अर्जही अवैध ठरल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी अजय मोरे यांनी दिली. 
 
शुक्रवारी झालेल्या छाननीमध्ये नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे- वाकळे नामदेव अर्जुन (बहुजन समाज पार्टी), सुजय राधाकृष्ण विखे (भारतीय जनता पार्टी), संग्राम अरुण जगताप (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), कलीराम बहिरू पोपळघट (भारतीय नवजवान सेना-पक्ष), धीरज मोतिलाल बताडे (राईट टू रिकॉल पार्टी), फारूख इस्माईल शेख (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष), सुधाकर लक्ष्मण आव्हाड (वंचित बहुजन आघाडी). 
 
तसेच संजय दगडू सावंत (बहुजन मुक्ती पार्टी), अप्पासाहेब नवनाथ पालवे (अपक्ष), कमल दशरथ सावंत (अपक्ष), सबाजीराव महादू गायकवाड (अपक्ष), गौतम काशिनाथ घोडके (अपक्ष), दत्तात्रय अप्पा वाघमोडे (अपक्ष), भास्कर फकिरा पाटोळे (अपक्ष), रामकिसन गोरक्षनाथ ढोकणे (अपक्ष), रामनाथ गहिनीनाथ गोल्हार (अपक्ष), सुदर्शन लक्ष्मण शितोळे (अपक्ष). 
 
याशिवाय शेख आबिद मोहम्मद हनिफ (अपक्ष), शेख रियाजोद्दिन फजलोद्दिन दादामियाॅ (अपक्ष), गणेश बाळासाहेब शेटे (अपक्ष), साईनाथ भाऊसाहेब घोरपडे (अपक्ष), सुनील शिवाजी उदमले (अपक्ष), ज्ञानदेव नरहरी सुपेकर (अपक्ष), संजीव बबन भोर (अपक्ष), संदीप लक्ष्मण सकट (अपक्ष), श्रीधर जाखुजी दरेकर (अपक्ष) यांचेही उमेदवारी अर्ज वैध ठरले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

एअर इंडिया संकटात; सीईओ कॅम्पबेल विल्सन यांचा राजीनामा

"आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती आहे," मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी घोषणा केली

रिक्षाचालकांवर लादलेल्या मराठी भाषेच्या आवश्यकतेवरून वाद, परवाना पडताळणीच्या आदेशामुळे चालक संतप्त

पंतप्रधान मोदींच्या बनावट सहीचा वापर करून ४ लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न; मुंबईत दोघांना अटक

LIVE: मुंबई सेंट्रल येथे ६० दिवसांच्या ब्लॉकमुळे गाड्यांवर परिणाम होणार

पुढील लेख
Show comments