Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रातील मतदार संख्या आणि मतदार नोंदणी बद्दल महत्त्वाचे

Webdunia
लोकसभा निवडणूक २०१९ चुरशीची होणार आहे. मात्र राज्यात किती मतदार आहेत जे लोकसभेसाठी मतदान करतील याबदल निवडणूक आयोगाने माहिती प्रसिद्ध केली आहे. सोबतच ज्यांनी अजूनही मतदार नोंदणी केली नाही त्यांना   सुद्धा मतदान  करता यावे यासाठी त्यांना नोंदणी करायला मुदत वाढ दिली आहे.
मतदारांची संख्या :-
              सन 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीच्या तुलनेत दिनांक दि.31 जानेवारी 2019 रोजी प्रकाशित अंतिम मतदार यादीनुसार महाराष्ट्रातील मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.               
अ.क्र. तपशील
सन 2014
सन 2019
1
पुरुष
4,27,70,991
4,57,02,579
2
महिला
3,80,26,914
4,16,25,819
3
तृतीयपंथी
918
2,086
 
एकूण
8,07,98,823
8,73,30,484
मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, असे सर्व नागरिक त्या त्या टप्प्यातील उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या 10 दिवस अगोदरपर्यंत दाखल करु शकतात.
मतदारयादी अद्ययावत  करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून सतत प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत करण्यात आलेले प्रयत्न थोडक्यात पुढीलप्रमाणे आहेत :-
ü   (मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी भेटी देणे)
जून-जुलै 2018 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी भेटी देऊन वंचित राहिलेल्या मतदारांकडून अर्ज प्राप्त करुन घेतले तसेच भावी मतदारांची माहिती घेण्यात आली.
ü  Special Summary Revision
सप्टेंबर- नोव्हेंबर 2018 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाची माहिती जनतेला यासाठी व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली. सुट्टयांच्या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सहकारी गृह निर्माण संस्थांच्या पदाधिकारांच्या माध्यमातून शहरी भागांमध्ये अधिकाधिक मतदार जोडण्यात आले आहेत.
ü  SVEEP
या कार्यक्रमांतर्गत मतदार जागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले. इतर शासकीय विभाग, अशासकीय संस्था व इतर यांच्या सहभागाने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत संदेश पोहचविण्यात आला.
ü  दिव्यांग मतदार (PwDs)
भारत निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने “सुलभ निवडणुका”  म्हणजेच“Accessible Elections” हे घोषवाक्य जाहीर केले आहे. या अंतर्गत दिव्यांग कल्याणासाठी कार्यरत दिव्यांग कल्याण आयुक्तालय तसेच इतर अशासकीय संस्था यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे.
या सर्व प्रयत्नांमुळे मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. मतदार यादी संदर्भातील ठळक बाबी पुढील प्रमाणे आहेत :-
· सन 2014 सालच्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येमध्ये 65,31,661 इतकी वाढ झाली आहे.
· सन 2011 च्या जनगणनेनुसार 1000 पुरुषांमागे 925 महिला (Gender Ratio) असे प्रमाण होते. त्या तुलनेत सन 2014 साली मतदार यादीतील महिलांचे प्रमाणे 889 इतके होते.  2019 मध्ये या प्रमाणात 911 अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.
· प्रथम मतदार 18-22 वर्षे 25,13,657 पुरुष, 17,32,146 महिला, 142 तृतियपंथी असे एकूण 42,45,945 नवीन मतदार नोंदणी झाली आहेत.
· याशिवाय 1,04,435 इतक्या सेनादलातील (Service Voters) मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.
· सन 2014 साली मतदारांना वाटप करण्यात आलेल्या छायाचित्र मतदार ओळखपत्राचे प्रमाण  90.43% तर सन 2019 मध्ये हे प्रमाणे 96.68 % इतके झाले आहे.
· या वर्षी मतदार यादीमध्ये एकूण 2,24,162 इतके अपंग मतदार समाविष्ट आहेत.

मतदानाची टक्केवारी :-
सन 2009 व सन 2014 साली झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीमध्ये झालेल्या मतांची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.
लोकसभा निवडणूक पुरुष % मतदान महिला % मतदान एकूण मतदान
सन 2009 53.67 47.39 50.67
सन 2014 62.24 57.98 60.32
 
मतदान केंद्र :-
सन 2014 च्या तुलनेमध्ये मतदान केंद्रांच्या संख्येमध्ये पुढील प्रमाणे वाढ झाली आहे.
तपशील लोकसभा -2014 लोकसभा-2019
ग्रामीण क्षेत्रातील मतदान केंद्रे 61,816 55,814
शहरी भागातील मतदान केंद्रे 27,663 39,659
एकूण मतदान केंद्रे 89,479 95,473

 आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, अपंगांसाठी रॅम्पची व्यवस्था, व्हील चेअर वरील अपंगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा व फर्निचर इ. किमान सुविधा (Assured Minimum Facilities) पुरविण्यात येणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: संविधानिक संस्थेचा अपमान करणे ही काँग्रेसची सवय म्हणाले शहजाद पूनावाला

काँग्रेसला संविधानिक गोष्टींचा अपमान करण्याची सवय आहे-शहजाद पूनावाला

नायजर नदीत बोट उलटल्याने 27 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक बेपत्ता

गावावरून परतल्यानंतर महायुतीच्या बैठकीला हजेरी लावणार एकनाथ शिंदे, आज घेणार मोठा निर्णय

कॅन्सरचे ऑपरेशन करताना महिलेच्या पोटात राहिली कात्री, 2 वर्षानंतर उघडकीस आले

पुढील लेख
Show comments