Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला राहुल गांधी यांनीच दिला

Webdunia
सोमवार, 29 एप्रिल 2019 (09:31 IST)
“अहमदनगर लोकसभेचं तिकीट मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीच दिला असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. त्यांची ही भूमिका पाहून धक्का बसला. राष्ट्रवादीने काँग्रेससाठी ही जागा सोडावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र स्वत: राहुल गांधीच पाठिशी राहिले नाहीत. त्यांनीच राष्ट्रवादीकडून तिकीट घेण्याची भूमिका घेतल्याने धक्का बसला”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
 
शरद पवार यांनी बाळासाहेब विखेंवर केलेल्या वक्तव्यांना मनाला वेदना झाल्या. नगरच्या जागेसाठी राहुल गांधींनाही भेटलो. भेटीत आलेले अनुभव धक्कादायक आहेत. काँग्रेसला जागा सोडावी अशी मागणी होती, राष्ट्रवादी तयार होत होती. राहुल यांनी राष्ट्रावादी कोणत्या कोट्यातून जागा देणार असे विचारले. त्यांनी मला राष्ट्रtवादीतून उभे राहण्यास सांगितले. ते माझ्यासाठी धक्कादायक होते. मला राहुल गांधींनी आमच्या पाठीशी उभे राहावे असे वाटत होते. मात्र, त्यांनी वेगळीच प्रतिक्रिया दिली. यांचे दुःख झालं असे त्यांनी सांगितले. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments