Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुजय विखेंसाठी गेला लग्न पत्रिकेतून मत मागायला नवरदेव पोहोचला तुरंगात

Webdunia
शनिवार, 6 एप्रिल 2019 (12:52 IST)
लग्न एक मोठा सोहळा असून अनेकजन हा अविस्मरणीय करण्यासाठी काहीतरी वेगळे करतात. त्यात लग्नपत्रिका म्हटली की अनेकदा हटके प्रयोग केले जातात. सामाजिक संदेश दिला जातो तर अनेकदा आपल्या आवडत्या सेलिब्रिटी आणि राजकीय पुढाऱ्याला पाठींबा मागितला जातो. मात्र अहमदनगर येथील एका ने आपली लग्नपत्रिक बनवली आणि तो थेट तुरुंगात गेला होता. यामध्ये  लग्नात भेट वस्तू नको, परंतु आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉ. सुजय विखे यांना जरूर मत द्या’, अशी विनंती करणाऱ्या निघोज (जि. नगर) येथील फिरोज शेख या उच्चशिक्षित तरुणावर आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा दाखल झाला असून त्याच्यावर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणूक विभागाचे निवासी उपजिल्हाधिकारी पाटील तसेच पारनेरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्या आदेशान्वये फिरते पथक अधिकारी शान मोहंमद शेख यांनी फिरोज विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, निघोज येथील निवृत्त पोष्टमास्तर अल्लाउददीन शेख यांचा बीएसस्सी फिजिक्स, एमबीए शिक्षण झालेला मुलगा फिरोज याचा विवाह हसनापूर (ता. राहता) येथील रहेमान पठाण यांची मुलगी मोसिना हिच्याशी ३१ मार्च रोजी डॉ. सुजय विखे यांचे गाव असलेल्या प्रवरानगर येथे पार पडला.या विवाहासाठी शेख यांनी छापलेल्या पत्रिकेमध्ये ”किसी भी तरह का तोहफा मत दिजीए, मगर अपने सुनहरे कल के लिए डॉ. सुजयदादा विखे पाटीलजी को जरूर वोट दिजीए’ असे अवाहन करण्यात आले होते.या पत्रिकेची जिल्ह्यात चांगलीच चर्चा झाली. विखे समर्थकांनीही सोशल मीडियावर फिरोजची पत्रिका अपलोड करून डॉ. विखे यांच्यावर कार्यकर्त्यांचे किती प्रेम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला.मात्र झाले उलटेच फिरोज याचे हे कृत्य आचारसंहिता कक्षातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याची चौकशी केली असता त्यात तथ्य आढळून आले. पत्रिका ताब्यात घेण्यात येऊन शान मोहंमद शेख यांनी गुरुवारी पहाटे फिरोज याच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला होता. फिरोजला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. नेत्याला खुश करायला गेला आणि अडचणीत सापडला अशी गत फिरीजची झाली आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments