Festival Posters

इम्रान खानच्या शपथविधी हे दोघे जाणार नाहीत

Webdunia
गुरूवार, 16 ऑगस्ट 2018 (08:54 IST)
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान १८ ऑगस्टला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, कपील देव आणि नवजोतसिंग सिद्धू यांना निमंत्रण पाठवले. मात्र  कपील देव आणि सुनील गावसकर इम्रान खानच्या शपथविधीला जाणार नाहीत. वैयक्तिक कारणासाठी आपण इम्रान खानच्या शपथविधीला जाऊ शकत नसल्याचं कपील देव यांनी सांगितलं. तर भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टेस्ट सीरिजनिमित्त गावसकर इंग्लंडमध्ये कॉमेंट्री करत आहेत. त्यामुळे गावसकर यांनाही या सोहळ्याला जाता येणार नाही. याबाबत गावसकर यांनी १२ ऑगस्टलाच इम्रान खानला कळवलं आहे.
 
दुसरीकडे नवजोतसिंग सिद्धूनं मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाकडे शपथविधी सोहळ्यासाठी पाकिस्तानला जायची परवानगी मागितली आहे. काँग्रेसचे नेते असलेले सिद्धू हे पंजाब सरकारमध्ये मंत्रीही आहेत. सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनाही याबाबत माहिती दिली आहे. कपील देव इम्रान खानच्या शपथविधी सोहळ्याला जाऊ शकत नसले तरी त्यांनी इम्रान खान आणि त्याच्या पक्षाला शुभेच्छा दिल्या आहेत

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: देशातील पहिले एआय आयुक्तालय महाराष्ट्रात सुरू होणार

महाराष्ट्र देशात पहिला! ‘लिव्हिंग विल’ डिजिटल रेकॉर्डचा मोठा निर्णय

चॅम्पियन वेटलिफ्टर साईराज परदेसी डोपिंगमध्ये पकडला गेला, चाचणी पॉझिटिव्ह आली

महाराष्ट्रात नवीन एआय आयुक्तालय स्थापन केले जाईल, महावितरणाचे दोन भागांत विभाजन केले जाईल

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मोहसिना किदवई यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन

पुढील लेख
Show comments