Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रोनाल्डो, मेसी यांचा शिरच्छेद करण्याची इसिसची धमकी

Webdunia
शुक्रवार, 18 मे 2018 (15:46 IST)
रशियात होणारे २०१८ फिफा वर्ल्ड कप सामने इसिसच्या निशाण्यावर असून फुटबॉल जगतातील स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अर्जेन्टीनाचा कॅप्टन लियोनल मेसी यांचा शिरच्छेद करण्याची धमकी इसिसने दिली आहे. इसिसने लोन वुल्फ दहशतवाद्यांमार्फत हे कृत्य करणार असल्याचे सांगितले आहे. इसिसने यासंदर्भात एक फोटोशॉपद्वारे एडिट करण्यात आलेला फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये दहशतवाद्यांनी फुटबॉलच्याच मैदानात रोनाल्डो आणि मेसीला पकडून ठेवले आहे. हा फोटो शेअर करत इसिसने लिहिले आहे की, या दोघांच्या रक्ताने मैदान रंगून जाईल. इसिसकडून काही दिवसांपूर्वी आणखी एक पोस्टर शेअर करण्यात आले होते. त्यामध्ये मेसीच्या तुरुंगापलिकडे उभा असून त्याच्या डोळ्यातून रक्ताश्रू ओघळत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यावर तुम्ही अशा राज्यासाठी लढत आहात. ज्याच्या शब्दकोशामध्ये अपयशाच नावच नाही, असेही लिहिले आहे.
 
रशियातील ११ शहरांमध्ये २०१८ फिफा वर्ल्ड कप सामने होणार आहेत. १४ जून २०१८ ला सुरू होणाऱ्या या स्पर्धेची सुरुवात रशिया विरुद्ध सौदी अरेबिया संघांमधील लढतीने होणार आहे. हा सामना मॉस्कोमधील लुजनिकी स्टेडियम मध्ये रंगणार आहे. इसिसने दिलेल्या धमकीमध्ये नावे घेतलेले खेळाडू हे फुटबॉल जगतातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहेत. रशियातील रूसमध्ये रंगणारी ही स्पर्धा १४ जून ते १५ जुलैपर्यंत खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये जगभरातून ३२ संघ सहभागी होणार आहेत.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments