Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदी हे 'कमांडर इन थिफ राहुल यांची टीका

Webdunia
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018 (11:01 IST)
पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर बोचऱ्या शब्दांत राफेल विमान खरेदी व्यवहारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली. मोदींना 'कमांडर इन थिफ' म्हणून राहुल गांधींनी संबोधले आहे. यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राहुल गांधींनी एक व्हीडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये व्यक्ती राफेल कराराची माहिती देत आहे. राफेल करारासाठी भारत सरकारने अंबानीचं नाव सूचवलं.  त्यामुळे माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता, असे माजी राष्ट्रपती फ्रास्वा ओलांद यांनी सांगितल्याचे हा व्यक्ती सांगत होते. या व्हीडिओला राहुल गांधींनी 'कमांडर इन थिफ बाबतचं कटू सत्य' असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे खूप मोठे काहीतरी झाले असे सांगितले आहे. गांधी यांनी फ्रास्वा ओलांद यांच्या वक्तव्यानंतर देशाचा चौकीदार चोर असल्याची टीका केली. नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांनी भारतीय लष्करावर १ लाख ३० हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राईक केल्याची टीकाही राहुल यांनी केली. राफेल वाद राहुल यांना कामात आला असून कॉंग्रेस जोरदार टीका करत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

मंदिर-मशीद मुद्द्यावर संजय राऊत यांनी दिले मोठे विधान, मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला

LIVE: शिवसेना युबीटी BMC निवडणूक एकट्याने लढवणार! संजय राऊतांनी दिले संकेत

शिवसेना युबीटी BMC निवडणूक एकट्याने लढवणार! संजय राऊतांनी दिले संकेत

महाराष्ट्रातील विभागांची विभागणी सरकारने अद्याप का केली नाही? आदित्य ठाकरे यांचा खुलासा

अरविंद केजरीवाल पुन्हा ईडीच्या तावडीत, निवडणुकीपूर्वी उघडले दारु घोटाळा प्रकरण

पुढील लेख
Show comments