Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरे तब्बल 14 वर्षांनंतर दिल्लीत दाखल

Webdunia
सोमवार, 8 जुलै 2019 (09:38 IST)
मनसे प्रमुख राज ठाकरे तब्बल 14 वर्षांनंतर दिल्ली आले आहेत. यावेळी राज ठाकरे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची सोमवारी (8 जुलै) दुपारी 12 वाजता दिल्लीत भेट घेणार आहेत. यासाठी राज ठाकरे दिल्लीमध्ये दाखल झाले. या भेटीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी ईव्हीएम विरोधातील आपली भूमिका राज निवडणूक आयुक्तांकडे स्पष्ट करणार असल्याची चर्माचा आहे. 
 
याआधी 2005 ला मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना ‘बाळ केशव ठाकरे, अ फोटोबायोग्राफी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी दिल्लीत गेले होते. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते.
 
दरम्यान, राज ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरलेल्या नीट परीक्षेच्या नियमांबद्दल दूरध्वनीवर बोलणे झाले होते. त्यावेळी मोदींनी राज ठाकरेंना दिल्लीत सदिच्छा भेट देण्याचे आणि स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले होते. मात्र, राज ठाकरेंचे दिल्लीला जाणे झालेच नाही. त्यानंतर राज ठाकरे मुलगा अमितच्या लग्नाची पत्रिका तत्कालिन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यासाठी जानेवारी महिन्यात स्वतः दिल्लीला जाणार होते, अशी चर्चा झाली. मात्र, त्यावेळीही ते दिल्लीला गेलेच नाही. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments