Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'त्याने' प्रोफाईल बदलले, मग स्‍वराज यांनी केली मदत

Webdunia
गुरूवार, 10 मे 2018 (16:43 IST)

परराष्‍ट्रमंत्री सुषमा स्‍वराज यांनी फिलिपाईन्‍समध्ये राहणार्‍या एका काश्‍मीरी युवकाला ट्‍विटरवरील प्रोफाईल पाहून मदत करण्यास नकार दिला. या प्रकरणात सध्या फिलिपाईन्‍सची राजधानी मनीला येथे राहणार्‍या काश्‍मीरी तरुणाने सुषमा स्‍वराज यांना ट्‍विटरवरून मदत मागितली. परंतु, एमबीबीएस विद्यार्थी असणार्‍या शेख अतीक @SAteEQ019 च्या या अकाउंटवर सुषमांना आक्षेपार्ह मजकूर आढळला. त्यामुळे त्या भडकल्या आणि त्यांनी त्याला कोणतीही मदत करण्यास नकार दिला. 

अतीकच्या ट्‍विटर प्रोफाईलवर 'भारत अधिकृत काश्‍मीरचा मुस्‍लिम असल्याचा गर्व आहे,' असे लिहलेले होते. यावर सुषमा यांनी उत्तर दिले की, "जर तुम्‍ही जम्‍मू काश्‍मीरमधील आहात, तर आम्‍ही तुम्‍हाला मदत करू. परंतु, आपल्या प्रोफाईलनुसार आपण भारत अधिकृत काश्‍मीरमधील आहात आणि अशी कोणतीही जागा नाही."   सुषमा यांच्या या उत्तरानंतर शेख अतीक याने आपल्या प्रोफाईलमध्ये सुधारणा केली. यावर सुषमा यांनी ट्‍विट केले की, मी खूश आहे की, आपण आपल्या प्रोफाईलमध्ये सुधारणा केली आहे. त्यानंतर सुषमा यांनी फिलिपाईन्‍समधील भारताचे उच्‍चायुक्‍त जयदीप मुजुमदार यांना शेख अतीकला मदत करण्याचे निर्देश दिले.

संबंधित माहिती

नागपूर मध्ये फ्लाईओपर वरून उडी घेतली महिलेने

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

मुलगा आणि मुलीच्या प्रेमापोटी संपुष्टात आली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पार्टी- अमित शाह

मध्यप्रदेशात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, एक गंभीर

भारताने चीन सीमेजवळ टँक रिपेअर युनिट उभारले, पाकिस्तानची अवस्था बिकट

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

पुढील लेख
Show comments