Marathi Biodata Maker

"'टवळी" ही शिवी नाही मग टवळी म्हणजे काय?

Webdunia
शनिवार, 1 नोव्हेंबर 2025 (15:54 IST)
आमच्या आजी-पणजीच्या तोंडी असणारा एक ग्रामीण (शिवी-सदृश्य) शब्द....
"'टवळी"'...
बऱ्याच दिवसात मराठी सिरियल/सिनेमात किंवा कोणत्यातरी लेखात हा शब्द खूप ऐकला आणि कुतुहल जागृत झालं... 
कि टवळी म्हणजे काय
शोध घेतला.. तर माहिती पड़ले ... ते असे 
पूर्वी घरातील वस्तूंना अनेक नावे होती.
(मराठी भाषा ही खूप प्रगल्भ आहे.)
प्रकाश देणाऱ्या वस्तू या शक्यतो स्त्रीलिंगी असत आणि काही पुलिंगी
उदाहरणार्थ - पणती, चिमणी, मशाल, समई, चुड, आरती, दिवटी आणि टवळी 
तर काही पुल्लिंगी - टेंबा, पलिता, भुत्या, कंदील, बोळा,काकडा, जावळा..
ह्या मध्ये "दिवटी" आणि "टवळी" हे सुद्धा दिव्याचे प्रकार आहेत. 
देवघरात असते ती दिवटी तर शेज घरात अथवा माजघरात असते ती "टवळी." 
दिवटी - ही एका जागी स्थिर असते, 
तर टवळी हवी तशी उजेडासाठी फिरवता येते.
ती कधी पण घरात, दारात, गोठ्यात, पडवीत नेता येते. म्हणजे टवळी उजेडा साठी सर्वत्र फिरते 
म्हणून गावभर फिरणाऱ्या एखाद्या स्त्रीला किंवा मुलीला टवळी
आणि घरात बसणारी दिवटी म्हणू लागले..
पुरुष-गटातील काम न करणाऱ्या पुरुषाला.. जो आडदांड आहे अशाला किंवा काही वेळा वंशाच्या दिव्याला सुद्धा दिवटा म्हण्टलेलं ऐकले असेल तुम्ही. 
टवळी प्रमाणे टवळा ही असतो बर.
गावातील प्रकाशासाठी वापरला जाणारा वेटोळ्याचा दिवा, ज्याची वात खूप मोठी असते, ती लवकर पेटत नाही, त्याला पेटवण्यासाठी खूप उशीर लागतो, त्याच्यावरून ही एक म्हण पडली.... 
एखादी व्यक्ती घरात उशिरा आली की घरचे लोक म्हणायचे
"आला टवळ्याला वात लावून" (म्हणजेच खूप उशिरा आलास.)   
तर तात्पर्य हेच की, 
टवळा व टवळी ही शिवी नसून प्रकाशासाठी वापरला जाणारा व विविध ठिकाणांवर फिरवला जाणारा दिव्याचा प्रकार आहे.

- सोशल मीडिया (माहिती आणि फोटो)

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर, हा खास खेळाडू परतणार

15 जानेवारी महानगरपालिका निवडणुकाच्या दिवशी राज्यातील कर्मचाऱ्यांना ‘पगारी सुट्टी

LIVE: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त

शरद पवारांसह राज्यातील सात खासदारांची राज्यसभेतून निवृत्ती

अमेरिकेने व्हेनेझुएलावर मोठा लष्करी हल्ला केला, ट्रम्पचा दावा - मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक!

पुढील लेख
Show comments