Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजित पवारांनी महायुतीकडे नाशिकची जागा मागितली, भुजबळ यांचा दावा

Webdunia
शुक्रवार, 12 एप्रिल 2024 (09:41 IST)
महायुतीच्या जागावाटपात नाशिक लोकसभा मतदारसंघ उपमुख्यमत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना महायुतीकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. अशातच भुजबळ यांनी  "अजित पवारांनी महायुतीकडे नाशिकची जागा मागितली आहे. मात्र तुम्हाला ही जागा घ्यायची असेल तर घ्या, पण तिथून छगन भुजबळ यांनाच उमेदवारी द्या, असं वरून अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना सांगण्यात आल्याचं त्यांनीच मला सांगितलं," असा दावा छगन भुजबळांनी केला आहे.

भाजप नेतृत्वाकडून छगन भुजबळ यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठीही विचारणा करण्यात आल्याचं बोललं जात होतं. मात्र ही चर्चा भुजबळांनी फेटाळून लावली आहे. "या चिन्हावर, त्या चिन्हावरच लढा, यासाठी माझ्याकडे कोणी मागणी केलेली नाही, विचारणा केलेली नाही, अट टाकलेली नाही," असा खुलासा भुजबळ यांनी केला आहे.
 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा जाहीर केला. यावर छगन भुजबळांना विचारले असता ते म्हणाले की, एक कार्यकर्ता आल्यावर आपल्याला आनंद होतो. राज ठाकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचा सुद्धा लोक माणसावर प्रभाव आहे. त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे महायुतीची ताकद निश्चितपणे वाढणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुकमा येथे सुरक्षा दलाच्या ट्रकवर IED स्फोटात दोन जवान शहीद

टॅक्सी आणि रिक्षाचालकां जीवन विमा संरक्षण मिळणार मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषणा केली

अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियावर मिळवलेला विजय आश्चर्यकारक नाही, कारण...

Pune Bus Accident:पुण्यात प्रवाशांनी भरलेली बस झाडावर आदळून अपघात, 22 प्रवासी जखमी

NEET पेपर लीक प्रकरणात महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अटक

सर्व पहा

नवीन

शिकाऊ कार चालकाच्या चुकीने एका महिलेचा मृत्यू , घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

NEET PG परीक्षा पुढे ढकलल्याबद्दल राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

पूल दुर्घटना, पूर्व चंपारणमध्ये बांधकामाधीन पुलाचा काही भाग कोसळला

NEET-UG Scam : नीट हेराफेरी प्रकरणात सीबीआय ने FIR नोंदवला

Chardham Yatra: बद्रीनाथ आणि यमुनोत्रीमध्ये चार यात्रेकरूंचा मृत्यू,मृतांची संख्या 150 च्या पुढे

पुढील लेख
Show comments