Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चाळीसगाव :‘मतदान करा…’ ५५ हजार विद्यार्थ्यांनी लिहिले आई-बाबांना पत्र

Webdunia
शुक्रवार, 5 एप्रिल 2024 (10:08 IST)
चाळीसगाव : लोकसभेसाठी मतोत्सवाची घोषणा नुकतीच देशभरात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. चाळीसगाव मतदारसंघातही निवडणूक पूर्वतयारीच्या कामांना वेग आला आहे. मतदान कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, आचारसंहिता कक्षाची स्थापना, मतदान केंद्रांची व्यवस्था त्याचबरोबर मतदार संघातील मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रोत्साहनपर प्रयत्न होत आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकतीच चाळीसगाव मतदारसंघांमध्ये भेट घेऊन निवडणूक पूर्वतयारी कामाचा आढावा घेतला. निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार तथा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी प्रशांत पाटील, गटशिक्षण अधिकारी तथा नोडल अधिकारी विलास भोई, अप्पर तहसीलदार जगदीश भरकर, निवडणूक नायब तहसीलदार संदेश निकुंभ यांनी मतदारांना आवाहन करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून भावनिक साद घातली. शाळेतील चिमुरड्यांनी आपल्या घरातील आई-वडील, आजी-बाबा, सज्ञान ताई, दादा यांना पत्र लिहून मतदान करण्याचे आवाहन करण्याचे निश्‍चित झाले.
 
चाळीसगाव मतदारसंघातील लोकशाहीच्या महासंग्रामात ३४१ मतदान केंद्रावर १३ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. यामध्ये तीन लाख ५८ हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत ५८.२० टक्के मतदान झाले होते. मतदानाचा हा टक्का वाढविण्यासाठी लहान बालकांनी आपल्या घरातील मतदारांना जागृत करण्यासाठी हा विशेष प्रयत्न केला आहे. चाळीसगाव तालुक्यातील ३४२ शाळा ५५ हजार विद्यार्थी सामूहिक पत्र लिहिण्याची मोहीम २ एप्रिल २०२४ रोजी फत्ते केली. विशेष म्हणजे प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी केलेल्या केवळ एका व्हॉट्सॲप मेसेजला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तालुक्यातील सुमारे अकराशे शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतल्याने एकाच दिवशी ५५ हजार पत्रे पालकांपर्यंत पोहोचली. या पत्राची पोहच शाळेमध्ये संकलित करण्यात येणार आहे. या पत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी पालकांना आपला देश हा प्रगल्भ लोकशाहीची ख्याती असलेला खंडप्राय देश आहे. आपल्या देशाचे सरकार निवडण्याचा अधिकार हा मतदारांचा आहे.
Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य

मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य, हरियाणात जे झालं ते महाराष्ट्रात होऊ देणार नाही

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला चेतन पाटीलला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघात 26 जण जखमी

हेअर ड्रायर चालू करताच स्फोट, महिलेची बोटे तुटली

पुढील लेख
Show comments