Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'महिलांनी जागे होण्याची वेळ आली आहे',करंजे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल शायना एनसीने सुनील राऊतांवर टीका केली

Webdunia
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024 (15:01 IST)
शिवसेना UBT उमेदवार सुनील राऊत यांनी उपनगरातील विक्रोळीतील टागोर नगर भागात एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केले होते. नंतर याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
 
मिळालेल्या महतीनुसार शिवसेना युबीटी आमदार सुनील राऊत प्रतिस्पर्धी शिवसेना नेत्या सुवर्णा करंजे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अडचणीत आले आहे. या मुद्द्यावरून सातत्याने वाद वाढत आहे. आता मुंबादेवी मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांनी राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या भावावर निशाणा साधला आहे. मुंबईतील विक्रोळी विधानसभा मतदारसंघात सुनील राऊत आणि करंजे एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहे.
 
तसेच करंजे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सोमवारी सुनील राऊत यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या 79  महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान या कलमांखाली गुन्हा दाखल केला. 
 
काय म्हणाल्या शायना एनसी?
शिवसेना नेत्या शायना एनसी म्हणाल्या की, 'सुनील राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांची मागासलेली विचारसरणी दिसून येते. ते आम्हाला शेळ्या आणि माल म्हणतात. यातून आपले मन आणि विचार पाहता येतात. या असंवेदनशील वक्तव्याविरोधात महाराष्ट्रातील महिलांनी जागे होण्याची वेळ आली आहे. आम्ही 20 नोव्हेंबरला योग्य उत्तर देऊ असे देखील शायना एनसी म्हणाल्या. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबरला होणार असून, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

चिंचवड विधानसभेच्या जागेवर भाजप कडूनआमदार अश्विनी जगताप यांना उमेदवारी

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी NIA कोर्टातून साध्वी प्रज्ञा ठाकूरला जामीन वॉरंट

शिवाजीनगर जागेवर भाजपचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधी यांच्या दौऱ्यावर टीका

Bandipora : दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार

पुढील लेख
Show comments