Marathi Biodata Maker

Friendship Day 2025 : पुण्यातील या ठिकाणी मित्रांसोबत फ्रेंडशिप डे साजरा करा

Webdunia
रविवार, 3 ऑगस्ट 2025 (07:30 IST)
Maharashtra Tourism : आज फ्रेंडशिप डे आहे. प्रत्येक मित्र मैत्रीण असतात. मित्र हा आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा व्यक्ती असतो. याकरिता आजच्या दिवसाला महत्व असते. तसेच फ्रेंडशिप डे हा दिवस आज तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रांसोबत व्यतीत करा. पण अश्यावेळेस कसा साजरा करावा हे समजत नाही, तर तुम्ही मित्रांसोबत नक्कीच फिरायला जाऊ शकतात. याकरिता आज आपण पुण्यातील काही पर्यटनस्थळे पाहणार आहोत जिथे तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रांसोबत वेळ घालवू शकतात. व फ्रेंडशिप डे साजरा करू शकतात. चला तर जाणून घेऊ या पुण्यातील रमणीय पर्यटनस्थळे.
ALSO READ: Friendship Day 2025 : या ठिकाणी तुम्ही मित्रांसोबत फ्रेंडशिप डे साजरा करू शकता
पुण्याला पूर्वीचे ऑक्सफोर्ड देखील म्हणतात. पुण्यात बघण्या सारखे खूप ठिकाण आहे. इथे हवामान खूप छान असतं. इतिहासाप्रमाणे इथे पेशवांचे राजवट होते. इथले सौंदर्य आणि निसर्ग प्रवाशांचे लक्ष वेधतात येथे फिरण्या बरोबरच आपण स्ट्रीट फूडचाही आस्वाद घेऊ शकता. येथे रस्त्यांवर भरपूर खाद्य पदार्थांचे ठिकाण आहे. जेथे बसून खाण्याचा आनंदच आगळा वेगळा आहे.

सिंहगड किल्ला
पुणे शहरापासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेला हा डोंगरी किल्ला सुमारे 2000 वर्ष जुना आहे. ट्रेकिंगसाठी हे एक चांगले डेस्टिनेशन आहे इथे आपण ट्रेकिंगचा आनंदच घेऊ शकत नाही तर आपण येथून संपूर्ण शहर देखील पाहू शकता. जर आपण इतिहास प्रेमी असाल तर हा किल्ला एकेकाळी मराठा साम्राज्याच्या काळात सक्रिय लष्करी चौकी म्हणून कामी येत होता.

राजगड किल्ला
सुमारे 4600 फूट उंचीवर स्थित, राजगड किल्ला 25 वर्षांहून अधिक काळ शिवाजीची राजधानी म्हणून कामी आला आहे. साहसी प्रेमींसाठी हे ठिकाण चांगले ठिकाण ठरू शकते. येथे रात्रभर कॅम्प लावून दुसऱ्या दिवशी सकाळी किल्ला पाहता येतो.

ओशो गार्डन
ओशो गार्डन हे शून्यो फाउंडेशनने तयार केलेले जापा झेन गार्डन आहे. हे ओशो आश्रमाच्या अगदी मागे आहे. या ठिकाणी एकदा भेट देता येईल. या ठिकाणचे सौंदर्य आपल्याला मोहित करेल.

एम्प्रेस गार्डन
ही बाग ब्रिटिश राजवटीची आणि त्यांच्या शक्तीची आठवण करून देणारी आहे. ब्रिटिशांनी या बागेला राणी व्हिक्टोरियाचे नाव दिले.

तसेच, तुळशीबाग, कात्रज प्राणी संग्रहालय, सारसबाग, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांसारखे अनेक ठिकाण पुण्यात तुम्हाला पाहावयास मिळतील. तुम्ही मित्र किंवा कुटुंबासह पुण्यातील ही ठिकाणे एक्सप्लोर करण्याचा प्लॅन करू शकता. तुम्ही मित्रांसोबत  पुण्यातील ही ठिकाणे एक्सप्लोर करण्याचा प्लॅन करू शकता.
ALSO READ: फ्रेंडशिप डे वर मित्रांसोबत मुंबईत भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

'है जवानी तो इश्क होना है' चा मजेदार ट्रेलर प्रदर्शित

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

Joke पेन्शन पेमेंट विभागाचा अधिकारी बेशुद्ध झाला

सौंदर्याची राणी ऐश्वर्या राय कान्समध्ये अवतरली

राजकुमार राव अभिनीत 'रफ्तार'ला प्रदर्शनाची नवीन तारीख मिळाली असून, तो आता २०२६ च्या दसऱ्याला प्रदर्शित होईल

पुढील लेख
Show comments