Dharma Sangrah

Kanakaditya Sun Temple दुर्मिळ आणि जागृत सूर्य मंदिरांपैकी एक कनकादित्य मंदिर रत्नागिरी

Webdunia
रविवार, 25 जानेवारी 2026 (07:30 IST)
Maharashtra Tourism : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी या गावात असलेले 'कनकादित्य मंदिर' हे महाराष्ट्रातील अत्यंत दुर्मिळ आणि जागृत सूर्य मंदिरांपैकी एक आहे. आज २५  रथ सप्तमी म्हणजेच सूर्य जयंतीअसल्याने या मंदिरात महत्त्व आणि तिथला उत्साह अधिकच वाढला आहे. दरवर्षी अनेक भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात.  कोकण रत्नागिरी येथे असल्याने मंदिर देखील खूप सुंदर आहे. 
 

कनकादित्य मंदिर मंदिराची वैशिष्ट्ये

इतिहास
असे मानले जाते की, हे मंदिर सुमारे ८०० ते ९०० वर्षांपूर्वीचे आहे. या मंदिराच्या स्थापनेमागे एक प्रसिद्ध लोककथा आहे. एका व्यापाराचे जहाज समुद्रातून जात असताना कशेळीच्या किनाऱ्याजवळ ते अचानक थांबले. खूप प्रयत्न करूनही जहाज पुढे जाईना. त्या जहाजात सूर्याची एक भव्य मूर्ती होती.
ALSO READ: मनोकामना पूर्ण करणारे भारतातील प्रसिद्ध 5 सूर्य मंदिरे
व्यापाराला स्वप्नात दृष्टांत झाला की, ही मूर्ती या भागात स्थापित करायची आहे. 'कनका' नावाच्या एका सूर्यभक्त महिलेने आपल्या झोपडीत या मूर्तीची स्थापना करण्यास मदत केली. 'कनका' आणि 'आदित्य' (सूर्य) यांच्या नावावरून या मंदिराला 'कनकादित्य' असे नाव पडले.
 

मूर्तीचे वैशिष्ट्य

येथील सूर्याची मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली असून ती अत्यंत तेजस्वी आणि प्रसन्न आहे. सूर्याच्या हातात कमळाची फुले असून मूर्तीची रचना प्राचीन शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. विशेष म्हणजे, हे मंदिर जांभा दगडाने बांधलेले असून कोकणच्या पारंपारिक वास्तुकलेचा प्रभाव त्यावर दिसतो.
 

प्रमुख उत्सव 

रथ सप्तमी उत्सव 
कनकादित्य मंदिरात 'रथ सप्तमी' हा वर्षातील सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी सूर्याच्या मूर्तीची भव्य रथातून गावातून मिरवणूक काढली जाते. राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी कशेळीत येतात. हा उत्सव केवळ एका दिवसाचा नसून पाच दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेला असतो.
 

इतर आकर्षण

मंदिराच्या आवारात एक मोठी 'ताम्रकुंडी' आहे. असे म्हटले जाते की, या कुंडीतील पाणी कधीही आटत नाही. तसेच, मंदिराचा लाकडी सभामंडप आणि त्यावरील कोरीव काम पाहण्यासारखे आहे.
 

कनकादित्य मंदिर रत्नागिरी जावे कसे? 

रत्नागिरी शहरापासून हे मंदिर रत्नागिरीपासून दक्षिणेला सुमारे ३० ते ३५ किमी अंतरावर आहे. तर राजापूर शहरापासून हे अंतर सुमारे ३० किमी आहे. रत्नागिरी किंवा राजापूरहून खासगी वाहन किंवा एसटी बसने कशेळीला सहज पोहोचू शकता.
ALSO READ: Sun Temples या सूर्य मंदिरांमध्ये दर्शन घेतल्यास आरोग्याने परिपूर्ण जीवन लाभते

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मातृभूमी'नंतर सलमान आता एका भव्य अॅक्शन अवतारात दिसणार, चित्रीकरण एप्रिलमध्ये सुरू

'आखिरी सवाल' मधील संजय दत्तचा दमदार लूक समोर, चित्रपट याच तारखेला प्रदर्शित होणार

विवेक अग्निहोत्री भूषण कुमार यांच्यासोबत मिळून 'ऑपरेशन सिंदूर' हा चित्रपट घेऊन येत आहे

एकता कपूरने 'द साबरमती रिपोर्ट'च्या सिक्वेलची घोषणा केली, टीझर व्हिडिओ शेअर केला

रॅपर बादशाहने पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप लग्न केले; जाणून घ्या....

सर्व पहा

नवीन

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

Hanuman Temples Maharashtra महाराष्ट्रातील प्रमुख, प्रसिद्ध आणि जागृत हनुमान मंदिरे

प्रकाश राज यांच्या आई सुवर्णलता यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

विवियन डिसेना पुन्हा एकदा वडील झाले

पुढील लेख
Show comments