Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इलेक्शन ड्युटीवर असलेल्या शिक्षकाचा मृत्यू

इलेक्शन ड्युटीवर असलेल्या  शिक्षकाचा मृत्यू
, सोमवार, 21 ऑक्टोबर 2019 (15:59 IST)
गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकाचा चंद्रपुरात उपचारादरम्यान मृत्यू झाला. निवडणूक कर्तव्यावरील शिक्षकाचा भोवळ येऊन पडल्यानंतर मृत्यू झाला आहे. बापू पांडु गावडे (45) हे निवडणूक कर्तव्यावर पायी जात होते. त्यावेळी रक्तस्ताप वाढल्याने ते भोवळ येऊन पडले. चंद्रपूरमध्ये रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान गावडे यांचा मृत्यू झाला.
 
बापू गावडे यांचा फिट्स आजारामुळे रक्तस्ताप वाढला होता. विधानसभा निवडणुकीसाठी एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथील बुथवर ते तैनात होते. मतदान केंद्र पथक हेडरी बेस कॅम्पवरुन पुरसलगोंदी केंद्राकडे पायी जात असताना गावडे भोवळ येऊन पडले.डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना एटापल्ली ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना आधी अहेरी आणि तिथून चंद्रपूरला हलवण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू  झाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Royal Enfieldची सर्वात शक्तिशाली बाइक भारतात लॉन्च होणार आहे! किंमत जाणून घ्या