Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मी, मुख्यमंत्री आणि अमित शाह लवकरच जागावाटप करणार - उद्धव ठाकरे

Webdunia
सध्या भाजप व शिवसेनेत नेत्यांचे इनकमिंग जोरात सुरु आहे. त्यात अजून एक आमदाराची भर पडली आहे. 
बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरेंनी शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. शिवतारे मागील दोन टर्म बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. यावेळी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेची वाट धरली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तरे यांच्या हातात शिवबंधन बांधले आणि भगवा झेंडा दिला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.
 
उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की शिवसेनेत  अजून कोण कोण येणार हे लवकरच सर्वाना समजणार आहे. पुढे  उद्धव ठाकरे म्हणाले  की शिवसेना आणि भाजप एकत्रच लढणार आहे. मी, मुख्यमंत्री आणि अमित शाह लवकरच जागावाटप करणार आहे. चांगले काम करण्यासाठी सहकारी मिळत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करत आहे. शिवसेनेत एक मोठा नेता लवकरच प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा आहे. 

संबंधित माहिती

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

मेक्सिकोच्या चियापासमध्ये झालेल्या गोळीबारात 11 जण ठार

T20 World Cup : बांगलादेशने T20 विश्वचषक 2024 साठी संघ जाहीर केला

IPL 2024 मध्ये एक नवा विक्रम रचला,पहिल्यांदाच इतके षटकार लागले

CAA: CAA अंतर्गत 14 लोकांना दिले नागरिकत्व प्रमाणपत्र,गृह मंत्रालयाची माहिती

लोकसभा निवडणूक 2024:उद्धव ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे म्हणत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला

अफगाणिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी कतारने मदत सामग्री पाठवली

दिंडोरी सभेत पंतप्रधान मोदींनी केला राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा दावा

15 वर्षांच्या मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, प्रेयसीसाठी पत्नीला सोडले होते

पुढील लेख
Show comments